पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स – मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १७ नोव्हेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ९५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून उपचार सुरू आहेत. तर ६१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष- चिंचवड ( ७० वर्षे ) , रावेत ( ६ ९ वर्षे ) , काळेवाडी ( ७२ वर्षे ) , भोसरी ( ६२ वर्षे ) , यमुनानगर ( ६३ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – नारायणगाव ( ६५ वर्षे ) , कोथरुड ( ६३ वर्षे ) , चाकण ( ५५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.

कोविड -१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे . कोरोना बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो , ही बाब लक्षात घेऊन फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे .

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे सातत्याने प्रयत्न केले जात आहे . विविध स्तरावर अहोरात्र केलेले प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या कोवीड नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे . असे असले तरी कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनी काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे .

शारिरीक अंतरभान , सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे या बाबींचा नागरिकांनी अवलंब करावा असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले . कोविड बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा अथवा कमीत कमी करावा . लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घ्यावा असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago