पिंपरी चिंचवड शहराची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल … शहरात आज १८२५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील मागील 5 दिवसातील रुग्णवाढ –

21 मार्च – 1 हजार 416 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू

22 मार्च – 1 हजार 187 नवे रुग्ण, 11 रुग्णांचा मृत्यू, 5 रूग्ण शहरा बाहेरील.

23 मार्च – 1 हजार 519 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू, 3 रूग्ण शहरा बाहेरील.

24 मार्च – 1 हजार 865 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू, 5 रुग्ण पिंपरी चिंचवड बाहेरील.

25 मार्च – 1 हजार 818 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड शहराची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल :-

पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे शहराची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवडची स्थिती काहीशी चिंताजनक बनली असल्याने राज्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तसा अलटीमेटम दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.२६ मार्च २०२१ ) रोजी १८६४ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १८२५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ३९ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८८६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०६ पुरुष – निगडी ( ७२ वर्षे ) , पिंपरी ( ८१,६६ , ३० वर्षे ) , चिखली ( ५० वर्षे ) , चिंचवड ( ८० वर्षे ) ०१ स्त्री- च – होली ( ३७ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

🔴 पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – सोलापुर ( ७ ९ वर्षे ) , लोहगाव ( ४० वर्षे ) , पुणे ( ८३ वर्षे ) , ०३ स्त्री तळेगाव ( ७० वर्षे ) , जुन्नर ( ४० वर्षे ) , खेड ( ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

🔴टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ५ मृत्यु झालेले आहेत .

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २६७
ब – २९७
क – १६२
ड – ३०१
इ – १५९
फ – २५२
ग – २६४
ह – १२३
एकुण – १८२५

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago