Google Ad
Uncategorized

बजाज पुणे ग्रॅंड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज

बजाज पुणे ग्रॅंड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज

जागतिक क्रीडा मंचावर अधोरेखित होणार पिंपरी चिंचवड शहराचे नाव

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १९ जानेवारी २०२६- पुणे जिल्ह्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल शर्यत बजाज पुणे ग्रॅंड टूर दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सी.एफ.आय), आशियाई सायकलिंग महासंघ (ए.सी.सी) आणि आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ (यु.सी.आय) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत असून, महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या स्पर्धेमध्ये भारतासह विविध देशांतील नामांकित, व्यावसायिक सायकलपटू सहभागी होणार असून, ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सायकल शर्यतींपैकी एक ठरणार आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक क्रीडा मंचावर अधोरेखित होणार आहे.

*ड्रोन चित्रीकरणातून शहराचे जागतिक दर्शन*
स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने थेट चित्रिकरण करण्यात येणार आहे. हे थेट प्रक्षेपण देश-विदेशातील विविध माध्यमांद्वारे दाखवले जाणार असून, यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य, रस्ते, पूल, चौक आणि एकूणच शहरी नियोजन जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. स्वच्छ, शिस्तबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख अधिक बळकट होण्यास यामुळे मदत होणार आहे.

*पिंपरी चिंचवड शहरातून जाणारा ५३ किलोमीटरचा मार्ग*
‘बजाज पुणे ग्रॅंड टूर’ अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातून दोन महत्त्वाचे टप्पे पार पडणार असून, हे दोन्ही टप्पे शहरातील प्रमुख चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांमधून जाणार आहेत.

१) टप्पा क्रमांक १ (दि. २० जानेवारी २०२६, मंगळवार)-
स्पर्धेचा पहिला टप्पा हिंजवडी फेज -३ येथील टीसीएस सर्कल येथून सुरू होणार आहे. त्यानंतर अनेक टप्पे पार करत स्पर्धा विनोदे वस्ती, भुमकर चौक, डांगे चौक, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, संत नामदेव महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाल्हेकरवाडी), राजयोग पेट्रोल पंप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (रावेत) मार्गे जात डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी येथे समाप्त होणार आहे. हा टप्पा पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाच्या नागरी व वाहतूक मार्गांमधून जाणार आहे.

या दिवशी दुपारी १२.३० वाजता अधिकृतपणे शर्यतीला सुरुवात होणार आहे. स्पर्धकांची नोंदणी व लाइन-अप प्रक्रिया दुपारी ११.०० वाजता पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय या टप्प्याचा समारोप डी. वाय. पाटील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे होणार असून, दुपारी ४.२० वाजता पारितोषिक वितरण कार्यक्रमास सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी ४.५० वाजता सर्व संघ व खेळाडू कार्यक्रमस्थळावरून प्रस्थान करणार आहेत.

२) टप्पा क्रमांक ४ (दि. २३ जानेवारी २०२६, शुक्रवार)-
स्पर्धेतील प्रमुख टप्पा श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी स्टेडियम येथून दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर पुण्यातील अनेक टप्पे पार करत औंध येथील राजीव गांधी ब्रिज येथून काळेवाडी फाटा, बास्केट ब्रिज (रावेत), डी. वाय. पाटील कॉलेज (आकुर्डी), भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणी नगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल, स्पाईन रस्ता, जुना आरटीओ रस्ता, आयुक्त बंगला, एम्पायर इस्टेट ब्रिज मार्गे जात पुन्हा काळेवाडी फाटा आणि राजीव गांधी पूल (औंध) येथून पुन्हा पुण्याकडे जाणार आहे. या टप्प्याचा समारोप जंगली महाराज रोड येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.

या मार्गांमुळे शहरातील विविध भाग एकाच आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

*आंतरराष्ट्रीय निकषांनुसार शहराची तयारी*
स्पर्धेच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या निकषांनुसार व्यापक तयारी करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती व विकसन, गतिरोधक हटविणे, चेंबर्स समपातळीवर आणणे, बीआरटी रेलिंगची दुरुस्ती व रंगरंगोटी, पुलांची रंगरंगोटी, थर्मोप्लास्टिक पेंटचे काम, चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यालगत कलात्मक भित्तीचित्रे, विद्युत व्यवस्था सुधारणे, तसेच संपूर्ण स्पर्धा मार्गाची विशेष साफ सफाई करण्यात आली आहे.

याशिवाय मार्गावरील बेवारस वाहने हटविणे व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

*क्रीडा पर्यटन आणि शहराच्या प्रतिमेला चालना*
‘बजाज पुणे ग्रॅंड टूर’ मुळे केवळ क्रीडा क्षेत्रालाच नव्हे, तर क्रीडा पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि शहराच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये अधिक प्रमाणात होण्यासाठी ही स्पर्धा दिशादर्शक ठरणार आहे.

‘बजाज पुणे ग्रॅंड टूर’ ही केवळ सायकल शर्यत नसून, पिंपरी चिंचवड शहराची आंतरराष्ट्रीय क्षमता दाखवणारी स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या निकषांनुसार शहरातील रस्ते, चौक, पूल आणि सार्वजनिक जागांची तयारी करण्यात आली असून, या माध्यमातून शहराचे सौंदर्य आणि नियोजन जगासमोर मांडले जाणार आहे. भविष्यात पिंपरी चिंचवड हे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे केंद्र म्हणून विकसित व्हावे, या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.
– श्रावण हर्डीकर. आयुक्त. पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!