पिंपळे गुरव येथील मोरया पार्क जवळ १३ वर्षाच्या मुलीचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू … हृदय द्रावक घटना!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, मोरया पार्क येथे एका डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली मुलगी डंपरच्या मागच्या चाकाखाली पडली तिच्या तोंडावरून डंपरचे चाक गेल्याने ती जागेवरच मरण पावली. ही घटना मात्र हृदय पिळवटून टाकणारी होती.

संजय साफरीया व त्यांची मुलगी रा. चिखली दोघे जण पिंपळे गुरव येथील मोरया पार्क मधील अक्षदा क्लिनिक जवळील भरत परमार यांचेकडॆ आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास संजय साफरीया व मुलगी विभूती साफरिया दुचाकीवरुन चिखलीला निघाले असंता मोरया पार्क येथील मेन रोडवर येताच डंपरने धडक दिल्यामुळे मागे बसलेल्या विभूती साफरिया ( वय १३) ही डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिच्या चेहऱ्यावरून चाक गेले. त्यामुळे विभूतीचा जागेवरच मृत्यू झाला. डंपर चालक याला सांगवी पोलीस चौकीत नेले आहे. डंपर देखील चौकीत नेला आहे.

घटनास्थळी सांगवी पोलीस दाखल होते. यावेळी येथील काही काळ रस्ता वाहतुकिसाठी बंद करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक शशिकांत कदम हे त्याठिकाणी उपस्थित होते त्यानीं तातडीने संपर्क करून मुलीचा मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पोहचविण्यात  मदत केली. तसेच या प्रकरणी सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मुळीग, उप पोलीस निरीक्षक गोविंद चव्हाण अधिक तपास करीत आहेत, घटनास्थळी पोलिसांनी माहिती दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

19 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago