पिंपळे गुरवचे ‘रियल हिरो’ … तानाजी जवळकर आणि अमरसिंग आदियाल यांनी वाचविले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण!

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ४ एप्रिल) : पिंपळेगुरव परिसरातील ६० फुटी रोडवर मशीदी समोर एका दुचाकीस्वार युवकाच्या गाडीला अपघात झाला. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने रस्त्यावर कोणीही नव्हते. अशा परिस्थितीत हा तरूण युवक सुमारे १० मिनीट रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तसाच पडलेल्या अवस्थेत होता. सदर माहिती राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल व तानाजी जवळकर यांना मिळतात ते दोघे स्वतः अॅम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहचले.

नंतर सदर अॅम्बुलन्स पोलीसांच्या स्वाधीन केली. यावेळी कर्तव्यदक्ष होमगार्ड दत्तात्रय गायकवाड यांनी स्वतः अंबुलन्स चालवून या अपघात ग्रस्त तरूणाला तातडीने हाॅस्पीटल मध्ये पोहचवले आणि तानाजी जवळकर व अमरसिंग आदियाल यांनी रुग्णालयात पोहचवण्यासाठी यंत्रणा कामी लावली. यामुळे युवकाला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले, सध्यातरी त्याच्या जिवाचा धोका टळला आहे .

तानाजी जवळकर अनेक वर्षे ही अँबुलन्स सेवा परिसरातील नागरिकांना पुरवत आहेत, यांच्या निशुल्क अॅम्बुलन्स सेवेमुळे आजपर्यंत अनेकांचे जीव वाचले आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या या आरोग्यसेवेचाअनोखा अनुभव आला. तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी अमर अदियाल व तानाजी जवळकर यांनी दाखवलेले प्रसंगवधान खरोखरच ते या तरुणासाठी खरे देवदूतच … म्हणले तर वावगे ठरणार नाही.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago