महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ मार्च) : पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात एक वर्ष झाली प्रशासकीय राजवट सुरू आहे. आणि अजून दिवाळी पर्यंत ती चालू राहू शकते. अशा वेळी नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रशासनाने दर सोमवारी जनसंवाद सभा, सारथी आणि इतर हेल्पलाइन नंबर अशा सुविधा देऊ केल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्याने आजी नगरसेवक माजी झाले. महापालिकेत प्रशासकीय राजवट आली. आता कधीही महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते. मात्र नागरिकांच्या समस्या सोडवायच्या कशा यावर स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून “एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नागरिकांची कामे करण्यासाठी महापालिकेला समांतर अशी यंत्रणा यात उभारली आहे. यामुळे “एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह,’ त्यामुळे सांगवी, नवीसांगवी, पिंगळे गुरव या भागातील नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविल्या जाणार आहेत, त्याकरीता या भागातील नागरिकांनी 7575981111 या मोबाईल नंबर वर फक्त फोन करायचा किंवा व्हाट्सएपवर माहिती फोटो आणि आपली समस्या काळवायची आहे. त्याची त्वरित दखल घेतली जाणार आहे, असे माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अगदी कचरा उचलण्यापासून ते ड्रेनेज लाइन, रस्त्याची कामे , पाणीपुरवठा, धूर फवारणी, महानगरपालिकेच्या योजना विषयी माहिती अशा समस्या परिसरातील नागरिक सांगू शकतात व्हाट्सएपच्या माध्यमातून व त्या या यंत्रणेच्या माध्यमातून सोडवित व आहेत.
प्रभागात प्रशासनाच्या समांतर ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह, ही यंत्रणा निर्माण केली असल्याने, ही यंत्रणा पोट निवडणूक होण्याअगोदर सुरू होती, आचारसंहिता असल्याने ती बंद होती, ती पुन्हा अधिक जोमाने सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षाही जलद प्रतिसाद देत असून नागरिकांच्या एका फोनवर समस्या सोडविण्यासाठी धावपळ सुरू होताना दिसत आहे.
पिंपळे गुरव, सांगवी- नवी सांगवी भागातील नागरिकांना आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी झगडावे लागत होते. परंतु आता प्रशासन आणि ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह, या दोन्ही यंत्रणा त्यांच्या दिमतीस उभ्या असल्याने नागरिकांमध्ये आनंद दिसून येत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…