महाराष्ट्र 14 न्यूज : कुठे राहता ? … तोंडातून नकळतपणे शब्द यायचे ‘पिंपळे गुरव’ पाण्याच्या टाकी जवळ! आता हीच त्याकाळी गावच भूषण असणारी पाण्याची टाकी आता इतिहास जमा होणार आहे. जुन्या काळात राहण्याची गावची खून म्हणून ही टाकी प्रसिद्ध होती, आता तिला अनेक नवे पर्याय झाले आहेत. गावची वाढती लोकसंख्या त्यामुळे नवीन पाण्याच्या टाक्या सुद्धा या भागात झाल्या. गावचा समावेश आता स्मार्ट सिटीत झाला, पर्यायाने शहरा बरोबर गाव स्मार्ट करण्यासाठी आणि जीर्ण झाल्यामुळे पिंपळे गुरव येथील जुनी पाण्याची टाकी पाडण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु झाले आहे.
पिंपळे गुरव मध्ये पंधरा ते वीस दशलक्ष लिटरच्या टाक्या आहेत. त्यांच्या तुलनेत मुख्य बस थांब्याजवळील ही टाकी खूपच लहान होती. त्यातच जीर्ण झालेली ही पाण्याची टाकी मागिल काही वर्षापासून बंद होती आणि स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या कामात तीचा अडथळाही होत होता. त्यामुळे पाणी पुरवठा विभाग यांचा सल्ला व ड प्रभागात त्याचा रितसर ठराव घेऊन ही टाकी पाडली जात असल्याचे कार्यकारी अभियंता मनोज सैठिया यांनी सांगितले. या टाकीच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावरची रहदारी लक्षात घेता सर्व बाजुंनी खबरदारी घेऊन पंधरी दिवसाच्या आत ती पाडली जाणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…