आईसाठी मुलगा उतरला प्रचाराच्या रिंगणात
पिंपळे सौदागर, पिंपळे निलख येथील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये प्रचाराचा दणका
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० फेब्रुवारी) : चिंचवड मतदार संघातील पोट निवडणुकीमध्ये आपली आई श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्यासाठी चिरंजीव आदित्यचा प्रचार जोमाने सुरू आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे निलख येथील अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जाऊन चिरंजीव आदित्य प्रत्येक मतदाराला भाऊंचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महायुतीच्या उमेदवार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे.
पिंपळे सौदागर मधील जस्मिन, साई वैभव, साई प्रेम पार्क, साई वास्तू, नम्रता मॅजिक, कस्टेलिया, श्रद्धा हेरिटेज, साई प्लॅटिनम, डिफोडील्स, रोझ व्हॅली, रोझ आयकॉन, घरोंदा, साई राज रेसिडेन्सी, ट्रेजर आयर्लंड, गणेश पार्क, पारस रिवेरिया, शिव साई रेसिडेन्सी, ईलेक्टिका, निसर्ग निर्माण, निसर्ग निर्मिती, साई कॅपिटल, डेस्टिनी, नवले पार्क, पारस रेसिडेन्सी, यश संकुल, अष्टविनायक, मिथिला नगरी, तुषार गार्डन या आणि अशा अनेक सोसायट्यांनी मध्ये आदित्य जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जाऊन कोपरा बैठकीच्या माध्यमातून, ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून, तसेच डोअर टू डोअर प्रत्येकाशी संवाद साधला.
नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद देत अश्विनीताईंनाच निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. संवाद साधताना नागरिकांनीही भाऊंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कामाचा गुणगौरव केला, आणि लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गेल्या अनेक वर्षांमध्ये चिंचवडच्या विकासात लक्ष्मण जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी प्रकल्पात आणण्यासाठी भाऊंनी अनेक प्रयत्न केले. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, खेळाची प्रशस्त मैदाने, मोठमोठी उद्याने, रस्ते, सार्वजनिक बस सुविधा, रेल्वे, मेट्रो, नाट्यगृहे, या आणि अशा अनेक गोष्टींचे भाऊंनी आपल्या कारकिर्दीमध्ये योजनाबद्ध नियोजन केले. आज आपण या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाऊंना अजूनही अनेक स्वप्नं साकारायची होती. भाऊंची अर्धवट राहिलेली स्वप्नं आता आपल्याला अश्विनीताईंच्या माध्यमातून पूर्ण करायची आहेत. त्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. अशी भावनिक साद आदित्य जगताप यांनी नागरिकांना दिली.
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…