सराईत गुन्हेगाराने चोरलेल्या वीस लाख पन्नास हजार रुपयाच्या १५ बुलेट मोटर सायकली हस्तगत … गुन्हे शाखा युनिट ३ ची कामगिरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२५ जाने. ) : पिंपरी चिंचवड शहरात मध्ये बुलेट मोटर सायकलचोरीचे प्रमाणदिवसेंदिवस वाढलेले होते. नमुद प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त , कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ यांनी सर्व गुन्हे शाखेतील अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या .

त्याप्रमाणेगुन्हे शाखा युनिट ३ येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बुलेट चोरी कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रीत करुन चोरी झालेल्या घटनास्थळावरील परीसरातील संपुर्ण सीसीटीव्ही फुटेज व सदर घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करुन त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल शिवाजी ढोबळे रा.घाटकोपर मुंबई हा बुलेट मोटर सायकलचोरीकरीत असलेचेदिसून आले . तसेचत्याचेइतर साथीदार यांची पुर्ण माहीती संकलितकेली व त्यांचेवर लक्ष केंद्रीतकेले .

दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड , गिरीश चामले पोलीस उपनिरीक्षक हे स्टाफसह खाजगी वाहनाने चाकण पोलीस ठाणेचे हददीत वाहन चोरी प्रतिबंधात्मक पेट्रोलिंगकरीत असताना पो.शि. प्रमोद ढाकणे व पो.शि.योगेश्वरकोळेकर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , अमोल ढोबळे याचे दोन साथीदार विशाल खैरे व विशाल मगर रा.जामखेड जि.अहमदनगर हे मोशी टोलनाका परीसरामध्ये अमोल ढोबळे याने चोरलेली बुलेट मोटर सायकल घेवून मोशी टोलनाका परीसरामध्ये विक्री करण्याकरीता येणार आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

नंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफसह मोशी टोलनाका येथे सापळा रचुन बातमीतील संशयीत दोन इसम 1 ) विशाल बाळासाहेब मगर , वय 20 वर्षे , रा.लेहणेवाडी , ता.जामखेड , जि.अहमदनगर 2 ) विशाल बंकट खैरे , वय 21 वर्षे , रा . भुतडाता.जामखेड , जि.अहमदनगर यांनाचोरीच्या बुलेटसह ताब्यातघेतलेत्यांचेवर सीआरपीसी 41 ( 1 ) ( ड ) प्रमाणेकारवाई करुनत्यांचेकडे कौशल्यपुर्ण अधिकतपास केला असता सदरचे बुलेट मोटर सायकल हीत्यांचामित्र अमोल ढोबळे याने चोरी करुन त्यांना विक्री करीता दिले. बाबतकबुलीदिलीतसेच अमोल ढोबळे याने 12 बुलेट मोटर सायकल वइतर 02 मोटर सायकलजामखेड येथेविक्रीकरीता ठेवले बाबत सांगितले . जामखेड येथेदोनतपास पथके रवानाकरुनत्या पथकाने 12 बुलेट व 02 मोटर सायकल अशी एकुण 14 वाहने तेथून जप्तकरुन आणण्यात आली आहेत . नमुद दोन्ही आरोपीकडूनपिंपरीचिंचवड , पुणे जिल्हा नवी मुंबई , ठाणे परीसरातुनचोरुन आणुनविक्रीकरीता ठवलेल्या 13 बुलेट मोटर सायकल व 01 अपाची मोटर सायकल .01 अॅक्टीवा मोपेड अशा एकुण 20,50,000 / – रुपयेकिंमतीच्या 15 मोटर सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत .

बुलेट मोटर सायकलचोरीतील पाहीजे आरोपी अमोल शिवाजी ढोबळे रा.पंतनगर , घाटकोपर , इस्ट , मुंबई याचा पथका मार्फत शोध चालु आहे . सदर बुलेट मोटर सायकली बाबत पिंपरीचिंचवड आयुक्तालय , पुणेग्रामीण , नवी मुंबई , ठाणे येथूनचो – या केल्या असूनत्या संदर्भात खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालय हददीतील चाकण पोलीस ठाणे 02 , भोसरीएमआयडीसी पोलीस ठाणे 02 , भोसरी पोलीस ठाणे 01 , पिंपरी पोलीस ठाणे 01 , हिंजवडी पोलीस ठाणे 01 पुणेग्रामीण हददीतील राजगड पोलीस ठाणे 02 , नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हददीतील नेरळ पोलीस ठाणे 01 , एपीएमसी पोलीस ठाणे 01 रबाळे पोलीस ठाणे 01. ठाणे शहर हददीतील कापुरबावडी पोलीस ठाणे 01 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .

यातील आरोपी अ.नं. 1 विशाल बाळासाहेब मगर , वय 20 वर्षे , रा.लेहणेवाडी , ता.जामखेड , जि.अहमदनगर याचेवर यापुर्वी जामखेड अ.नगर येथे फायरींगकरुनजिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं .81 / 2020 मा.दं.वि.कलम 307,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदरचीकारवाई ही मा . पोलीस आयुक्त , श्री . कृष्ण प्रकाश , मा . अपर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे

मा.पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) श्री . सुधिर हिरेमठ , मा . सहा पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री.आर.आर. पाटील , मा . सहा पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्रीमती प्रेरणाकटटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीसनिरीक्षक शंकर बाबर , पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज – हाड , पोलीस उप निरीक्षकगिरीशचामले , हजरत पठाण , यदु आढारी , सचिन मोरे , विठठल सानप , गंगाधर चव्हाण , योगेश्वर कोळेकर , नाथाकेकान राजकुमार हनमंते , सागरजैनक , त्रिनयन बाळसराफ , शशिकांतनांगरे , राहुल सुर्यवंशी , प्रमोदढाकणे , जगदीश बुधवंत व गजानन आगलावे यांनी केली आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago