विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या स्पर्धेचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयोजन केले आहे. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यंपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील विषयांची रचना पाहता या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या संकल्पना शहराच्या शाश्वत विकासासाठी पुरक ठरणार आहेत.
सदर स्पर्धा तीन श्रेणीमध्ये असतील. सातवी ते नववीच्या विध्यार्थ्यांसाठी उप कनिष्ठ श्रेणी, दहावी ते बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी कनिष्ठ श्रेणी आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ श्रेणी असेल. स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी असली, तरी या निमित्ताने पालक आणि शिक्षकांच्या मनातील संकल्पनाही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नक्कीच मांडल्या जाऊ शकतात. एका अर्थाने संपूर्ण शहरातील नागरिकांना त्यांचं स्वप्नातील शहर साकारण्यासाठी उत्तमोत्तम संकल्पना मांडण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेतील विजेत्यांना वैयक्तिक आणि सांघिक अशी एकूण ७ लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठीची नोंदणी दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरु होत असून, नोंदणीचा अंतिम दिनांक ३ जानेवारी २०२४ ही असेल. सदर संकल्पनांचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षकांकडून दि. २० जानेवारी २०२४ रोजी करण्यात येईल व स्पर्धेची अंतिम फेरी दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडेल. सहभागी होण्यासाठी http://www.lpjfoundation.com या वेबसाइटवर प्रोजेक्ट सबमिट करावा व अधिक माहितीसाठी 8956002507/ 8956002508/ 8956002509 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सादर होणाऱ्या सर्व संकल्पनांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी वार्डनिहाय सर्वोत्तम संकल्पना निवडण्यात येतील तसेच शहरा विकासासाठी साहाय्यभूत ठरतील अशा सर्वोत्तम संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी व या संकल्पनेचे ‘पेटंट’ स्पर्धकाला मिळवून देण्यासाठीही आवश्यक सहकार्य करण्यात येईल.
…या विषयांवर कल्पकता सादर करा!
१- शाश्वत स्मार्ट सिटी: यामध्ये कचरा व्यवस्थापन, शहरी गतिशीलता, रहदारी, पायाभूत सुविधा, आपत्ती सुसज्जता, जल व्यवस्थापन आणि संवर्धन, सार्वजनिक उपयोगिता आणि सेवा सुलभता, सर्वसमावेशक सेवा वितरण (सर्व विभाग/लिंग) असे उपविषय समाविष्ट आहेत. २- डिजिटलायझेशन : ॲप्स आणि प्लॅटफॉर्म, आयसीटी (माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान), ई-गव्हर्नन्स, ई-नागरिक सेवा वितरण, तक्रार निवारण, आयएमसी वेबसाइट, पीसीएमसी/सारथी ॲप असे यातील उपविषय आहेत. ३- पर्यावरण: प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा आणि संसाधने, हरित पट्टे. असे उपविषय आहेत. ४- महसूल : महसूल स्रोत, खर्च, सर्वोत्तमीकरण असे यातील उपविषय आहेत. ५- नागरी आरोग्य आणि निरोगीपणा: यामध्ये आरोग्य सेवा सुलभता, स्वच्छता, मानसिक आरोग्य, सजगता हे उपविषय आहेत. ६- संस्कृती आणि वारसा: सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन असे उपविषय आहेत.
उद्योगनगरी म्हणून लौकिक असलेले पिंपरी-चिंचवड शहर भविष्यात उत्तम संकल्पनांचे आणि कल्पकतेचे शहर म्हणून ओळखले जावे. या करिता ‘एलपीजे इनोव्हेशन अवॉर्ड्स-२०२४’ ची घोषणा केली आहे. शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आगामी काळात शहराच्या शाश्वत विकासामध्ये नागरिक, विद्यार्थ्यांच्या कल्पकतचे योगदान महत्त्वपूर्ण राहील. त्याद्वारे शहरवासीयांची जीवनशैली उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील, असा विश्वास आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…