दिव्यागांना मिळाला आयुष्याचा जोडीदार … कोरोनाचे नियम पाळत उत्साहात विवाहसोहळा संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज : जन्मत:च आलेले अपंगत्व, बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे होणारी फरफट, आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी निघून गेलेली लग्नाची वेळ, अशा अपंगांना आयुष्याचा जोडीदार मिळाला. पिंपरी-चिंचवड अपंग विद्यालय निगडी येथे पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळय़ात पाच जोडपी विवाहबद्ध झाली नि त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद फुलला. या जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असा होता.

दिव्यांग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे केवळ पाच जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित केला होता. हे सर्व वधू-वर नांदेड, सातारा, चिपळून, परभणी, वसरणी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून कमी लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यासाठी समाजातील अनेकांच्या सहकार्यातून प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी साहित्य, कपाट, दिवाण, पिठाची गिरणी, कपडे, भांडी, इतर साहित्य देण्यात आले.


या सोहळ्याप्रसंगी दिव्यांग प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र सरडे यांनी सांगितले, की दिव्यांगांना मदतीची खूप गरज असते. कोणाला आईची माया मिळालेली नसते. वडिलांचे छत्र हरपलेले असते. भाऊ बहिणीचे प्रेम मिळालेले नसते. घरची परिस्थिती गरिबीची हलाखीची असते. असे अविवाहित शोधून दिव्यांग प्रतिष्ठान त्यांचे विवाह करून समाजामध्ये एक प्रकारची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.

या विवाह सोहळ्यासाठी मां ,श्री ,विनोदजी बनसल श्री ओम प्रकाश पेठे श्री महेशजी मानेकर श्री प्रसादजी खंडागळे श्री, अरुण पवार श्री रवि जनवरे श्री विलास लांडगे श्री रवि कंलबकर तसेच उद्योग, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

22 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago