गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेला … पिंपरीत सातव्या मजल्यावरुन खाली जमिनीवर पडून बालकाचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गॅलरीत खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याने 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवडमधील कोहिनूर शांग्रिला इमारतीच्या सातव्या मजल्यावर गावडे कुटुंब राहतं. अथर्व दीपक गावडे हा त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता. तेव्हा त्यांची घरात काम करण्यात व्यस्त होती. भावासोबत खेळता-खेळता अथर्व गॅलरीवर चढला. गॅलरीतून तो खाली डोकावून पाहत होता, त्याच वेळी त्याचा तोल गेला आणि अथर्व थेट खाली जमिनीवर पडला.

लहान भावाने रडत जाऊन आईला हा प्रकार सांगितला, तेव्हा हा गंभीर प्रकार तिच्या लक्षात आला. अर्थवला जखमी अवस्थेत तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. काल दुपारी चार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पिंपरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago