Pandharpur : पंढरपूर पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट … भाजपकडून राम शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा

महाराष्ट्र 14 न्यूज : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उशीर का केला जातोय? असा सवालही आता विचारला जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेतली. मात्र, त्यावेळी उमेदवारी जाहीर केली नाही. त्यानंतर दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी भालके कुटुंबातील उमेदवार जाहीर करण्यास होत असलेला उशीर म्हणजे पार्थ पवार यांच्यासाठी वातावरण निर्मिती असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

भाजपकडून राम शिंदे मैदानात?

दुसरीकडे भाजपचा उमेदवारही अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही. भाजप प्रभारींनी बैठक घेत उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं. भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असं असताना आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले डॉ. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे केलं जात आहे.
पंढरपूर-मंगळवेठा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे.

पंढरपुरात तिरंगी लढत होणार?

भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके कुटुंबाला उमेदवारी टाळत पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली, तर भगिरथ भालके हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेठा मतदारसंघाची पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहेत.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम –

>> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
>> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
>> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
>> मतदान – 17 एप्रिल 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे 2021

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago