पिं.चिं. मनपाच्या नवी सांगवी-पिंपळे गुरव प्रभाग क्रं.३१ मध्ये ‘स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा’ … अंतर्गत प्लास्टिक मुक्त अभियान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत मिशन नागरी व स्वच्छ महाराष्ट्र मिशन नागरी अनुसार ऑगस्ट महिना “स्वच्छता संकल्प देश का हर रविवार विशेष सा” या अंतर्गत प्लास्टिक मुक्त बाबत अभियान प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी मध्ये घेण्यात आले.

साई चौक येथील मंडई परिसरामध्ये व्यवसायिकांना/ ग्राहकांना प्लास्टिक वापर न करणेबाबत व इतरांनाही प्लास्टिकचा वापर न करू देणेबाबत आरोग्य विभागामार्फत सूचना देण्यात आल्या. अनेक नागरिक, व्यवसायिक यांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला बर्‍यापैकी सर्वच नागरिक प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करताना सर्रास दिसून आले, याबाबत सूत्रसंचालन रमेश भोसले सहाय्यक आरोग्य अधिकारी उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक प्रभाग क्रमांक ३१ विनोद कांबळे घंटागाडी कर्मचारी यांनी केले.

तसेच “नको दंड नको शिक्षा, स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहर हीच अपेक्षा” या बोधवाक्य चा पाढा वाचत उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक यांनी प्रभागातील सर्व चिकन,मटन मासोळी व्यवसायिक यांना एकत्र करून काटेपुरम चौक येथे सभा आयोजित करून प्लास्टिकचा वापर न करणे बाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली, सर्व व्यावसायिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला तसेच यापुढे कॅरीबॅग चा वापर केल्यास उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक यांनी कारवाई यापुढे तीव्र स्वरूपात करणार असल्याचे सांगितले आहे.

सदर कार्यक्रमावेळी रमेश भोसले सहाय्यक आरोग्य अधिकारी, महेश आढाव मुख्य आरोग्य निरीक्षक, उद्धव डवरी, सुनील चव्हाण, संजय मानमोडे, धनश्री जगदाळे आरोग्य निरीक्षक हे उपस्थित होते अशाप्रकारे प्लास्टिक न वापराबाबत सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी मध्ये घेण्यात आले तसेच आज नवी सांगवी मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची विक्री करणाऱ्या बड्या व्यावसायिकांवर प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली कृष्णा चौक येथील तीन व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे १५ हजार रुपये दंडात्मक कारवाई आरोग्य विभागाअंतर्गत करण्यात आली तसेच तब्बल १४० किलो अवैध प्लास्टिक आरोग्य विभागामार्फत जप्त करण्यात आले.

सदर कारवाई वेळी रमेश भोसले सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, संजय मानमोडे, सुनील चव्हाण, धनश्री जगदाळे आरोग्य निरीक्षक राहुल जेटीथोर, रवी रोकडे, रूपाली साळवे, दशरथ बांबळे आरोग्य सहाय्यक विकास कांबळे, कविता गोहेर मुकादम ज्योती भालेराव मदतनीस तसेच कुणाल कांबळे, दिलीप नाईकनवरे, सिद्धार्थ जगताप, प्रवीण गायकवाड, गणेश भंडारी, मारुती देवकुळे, विनोद कांबळे, संतोष कदम आरोग्य कर्मचारी उपस्थित होते

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

19 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago