महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ डिसेंबर) : लहान वयात व तरुणात तंबाखूचे व्यसन करण्याचे प्रमाण वाढले असून मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, यामुळे कुटुंबावर अर्थिक भार वाढल्याने कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था कोलमडून जात आहे याला आळा घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. सुवासिनी घाणेकर यांनी केले.
पुणे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासाठी माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक स्वप्ना गोरे यांच्या प्रयत्नाने कोटपा 2003 तंबाखू नियंत्रण कायदा याच्या प्रभावी अंमलबजावणी करता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. घाणेकर बोलत होत्या. यावेळी राज्य अधिकारी जीया शेख यांनी कोटपा कायद्याच्या विविध कलमांची माहिती दिली. कोटपा कायदा त्याचे अधिकार व कर्तव्य तसेच अधिकाऱ्यांची भूमिका यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
शहरातील पान टपऱ्या, हुक्का बार, शालेय परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे प्रमाण व त्यावरील कार्यवाही याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम कॅन्सरचे वाढते प्रमाण व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत चालणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. पिंपरी चिंचवड नार्कोटिक्स विभागाचे उपनिरीक्षक प्रशांत महाले यांनी कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व त्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाही याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…