Google Ad
Uncategorized

दिव्यांग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने … १२ दिव्यांग जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्यावतीने दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा १२ दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक सोहळा बुधवार, दि. १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता ‘दिव्यांग कल्याणकारी संस्थे’च्या मैदानात होणार आहे.

दिव्यांगाप्रती प्रेम व संवेदना असलेले समाजातील घटक सोहळ्यासाठी मदत करणार असून, समाजाच्या मदतीच्या भरोशावर दिव्यांगाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच, पुणे शहर सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उद्योजक पुनीत बालन आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

या सोहळ्याचे आयोजन सक्षम पुणे महानगर व ‘दिव्यांग कल्याणकारी संस्थे’च्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. ‘दिव्यांग कल्याणकारी संस्थे’चे अध्यक्ष प्रदीपदादा रावत त्याचबरोबर ‘सक्षम’चे प्रांत सचिव महेश तांकसाळे, ‘सक्षम’ प्रांताचे अध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे, ‘सक्षम’ पुणे महानगर सचिव दत्ता लखे, प्रांताचे सहसचिव गहिनीनाथ नलावडे व सर्व कार्यकर्ते कार्यरत आहेत.

स्थळ : दिव्यांग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्र, वानवडी, पुणे ४११००४

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!