Google Ad
Uncategorized

पुण्यात लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने ग्राहक जनजागृती अभ्यास वर्गाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ ऑगस्ट) : लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ग्राहक जनजागृती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबिर व अभ्यास वर्गाचे आयोजन आज (दि.२७ ऑगस्ट) रोजी पुणे शहरातील औंध येथे लोककल्याण ग्राहक संस्थेचे अध्यक्ष श्री दिनकर मधुकर आमकर, अनंत रहाटे – सरचिटणीस, चंद्रकांत खोपटकर कार्याध्यक्ष, सौ. उमाताई कांबळे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.

आज पुणे येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्राहक चळवळ म्हणजे काय ? याची माहीत देण्यात आली, यामध्ये ग्राहक संस्थेचे उद्देश (घटनावाचन), ग्राहक संघटनेत ( चळवळीत भाग घेण्याची गरज का आहे., पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, वजन, वस्तू, माप, तराजू, बिलमधून होणारी ग्राहकांची फसवणूक, स्थिर भाव विक्री व सरकारी योजनांची माहिती, भेसळ कशी ओळखावी व त्यानंतर त्याची कारवाई कशी करावी ?, अन्न औषध प्रशासनाची जबाबदारी, जिल्हा ग्राहक परिषदेच्या अधिकाऱ्यांची माहिती, राज्य ग्राहक आयोगाची जबाबदारी, देशाच्या ग्राहक आयोगाची जबाबदारी या ११ मुद्दयासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Google Ad

ग्राहकांनी खरेदी करताना मॅन्युफॅक्चरिंग डेट, प्राईस आणि एक्सपायरी डेट बघूनच पदार्थ वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच पारदर्शक व्यवहार कसा करावा? याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध शहरातून आलेले अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था,महाराष्ट्र यांच्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष दिनकर आमकर, सरचिटणीस सौ.उमाताई कांबळे तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री.अनिल पाडाळे,श्री.गजानन अंकुशे,सौ.रेखा डिंबर व इतर उपस्थितांना प्रशिक्षण दाखला देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ज्योती गुरव, सौ. अर्चना बेलवलकर, सुभाष धुमाळ, आमिर सय्यद, गिरीश जुनवणे, जनार्दन कोंडविलकर, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सौ. धनिता सुतार, महाराष्ट्र राज्य संघटक चंद्रकांत धोत्रे, सौ. विणा कर्वे  श्री. शैलेश कागलकर, कु. योगेश आस्कट, महाराष्ट्र राज्य उपसंपर्कप्रमुख सौ. सुमन काते, अनिता जोशी सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी (महिला व पुरुष ) उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!