पवित्र रमजान महिना साजरा करणे बाबत मुस्लिम बांधवांकरीता पिंपरी चिंचवड आयुक्तांनी केले आदेश निर्गमित …. काय आहेत आदेश, वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १७ एप्रिल) : कोरोना विषाणूमुळे ( कोविड – १९ ) उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाय योजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना आखण्याची आवश्यकता झाली आहे . पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणू बाधित पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढत आहे . येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .

महाराष्ट्र कोविड – १९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड – १९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी दि . १७.०४.२०२१ ते दि . १३ किंवा दि . १४.०५.२०२१ पर्यन्त पवित्र रमजान महिना साजरा करणे बाबत खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत .

🔴असे आहेत आदेश :-

▶️कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण , तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत . नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये ,

▶️ सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सोशल डिस्टन्सीग ( Social Distancing ) व स्वच्छतेच्या नियमांचे ( मास्क व सॅनिटायझर इत्यादी ) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा .

▶️ या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पूर्वी उपवास सोडतात . या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ , अन्नपदार्थ विक्रेते या ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी संबंधित प्रभागाचे सहायक आयुक्त / क्षेत्रीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती उपाययोजना करावी .

▶️पवित्र रमजान महिन्यात शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण ( अलविदा जुम्मा ) करण्याची प्रथा आहे . त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात . परंतु यावेळी कोविड – १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरिता एकत्र जमू नये , आपापल्या घरातच दुवा पठण करावे ,

▶️शब – ए – कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्यात २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे . या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात . परंतु या वर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरी करावेत .

▶️ धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमाचे आयोजन मे . शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत .

▶️कोविड – १ ९ या विषाणूच्या अनुषंगाने पिंपरी चिचवड महानगरपालिका क्षेत्रात कलम १४४ ( संचारबंदी ) लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत व नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये .

▶️ या पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका , धार्मिक , सामाजिक , सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये .

▶️धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू , सामाजिक कार्यकर्ते , राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी .

▶️या संदर्भात में . महाराष्ट्र शासन , गृह विभाग , यांनी दि . १२ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील .

▶️ कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित सहायक आयुक्त / क्षेत्रीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे , संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . केंद्र सरकार / महाराष्ट्र शासन / पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार , अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील . सदर आदेश दि . १७.०४.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . असे आदेश पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी दि . १७.०४.२०२१ रोजी दिले आहेत .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago