Categories: Uncategorized

सीसीटीव्ही निविदेतील ‘मॅफ’च्या मक्तेदारीला विरोध – राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली सीसीटीव्ही इन्टॉलेशन कामाची निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बाजारात विविध पर्याय असताना विशिष्ट कंपनी आणि उत्पादनांच्या मक्तेदारीला प्रोत्साहन देणारी  ‘मॅन्युफॅक्चर ऑथरायझेशन लेटर’ (MAF) ची अट प्रशासनाने घातली आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी तीव्र विरोध केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन वजा इशारा दिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सीसीटीव्ही बसवण्यासाठी सुमारे १७० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. मात्र, निविदेतील अटी-शर्ती विशिष्ट ठेकेदार कंपनीला डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्या आहेत, असा आमचा आरोप आहे.
निविदा काढताना प्रशासनाने ‘मॅन्युफॅक्चर ऑथरायझेशन लेटर’ (MAF) बंधनकारक असते. सिस्टिम इंटिग्रेटर अथवा ठेकेदाराला एखादी निविदा भरण्यासाठी संबंधित कंपनीकडून अनुमती पत्र दिले जाते. या नियमाचा आधार घेत केवळ एचपी ( HP)  याच कंपनीचे मॅनेजेबल स्वीच, सर्व्हर, स्टोरेज घेता यावेत, अशी तजवीज सल्लागार कंपनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करुन केली आहे.एचपी (HP) या एकाच कंपनीची उत्पादने  डोळ्यांसमोर ठेवून निविदेला ग्राह्य होईल असे ‘ तांत्रिक स्पेसिफिकेशन’ सदर निविदेत आहे. वास्तविक, प्रशासनाने तयार केलेले ‘स्पेशीफिकेशन’ हे सर्व उच्च दर्जाच्या कंपन्यांना व पुरवठादार एजन्सींना ग्राह्य धरु शकेल, अशा प्रकारचे सर्वसमावेशक असणे अपेक्षीत आहे. मात्र, तसे झालेले नाही, असा आरोपही आमदार बनसोडे यांनी केला आहे.
… अन्यथा विधानसभा सभागृहात आवाज उठवणार !
एचपीसह जागतिक दर्जावर काम करणाऱ्या पाच ते सहा कंपन्या स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्पांमध्ये काम करीत आहेत. पण, MAF च्या नावाखाली बाजारातील स्पर्धक कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येवू नये. केवळ आपल्या मर्जीतील कंपनीला निविदा भरता  यावी, असा खोडसाळपणा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे, ही बाब आक्षेपार्ह असून, या निविदेतील MAF ची अट रद्द करावी. ज्यामुळे स्पर्धक कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येईल. तसेच, या प्रकरणाची  तात्काळ सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकारी व सल्लागार कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. MAF ची अट रद्द करावी आणि खुली स्पर्धा व्हावी. सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाचा योग्य विनियोग व्हावा. अन्यथा प्रशासनाविरोधात विधानसभा सभागृहात मला भूमिका मांडावी लागेल, असा इशाराही आमदार बनसोडे यांनी दिला आहे.
Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी… कोण होणार, चिंचवडचा आमदार ?

  महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…

21 hours ago

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

6 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

1 week ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

1 week ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

1 week ago