महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १० ऑक्टोबर) : सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळास आवश्यक विविध प्रकारच्या परवानग्या / ना हकरत दाखले पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पोलीस विभाग यांचे मार्फत देण्यात येतात. परंतु यापुर्वी सदर विविध परवानग्या ऑफलाईन पध्दतीने देत असल्याने नवरात्रोत्सव मंडाळाना म.न.पा कार्यालयातील तसेच पोलीस स्टेशनमधील २ ते ४ कार्यालयात संपर्क करावा लागत असे. यामुळे नवरात्रोत्सव मंडाळाचा नाहक वेळ वाया जातो. तसेच म.न.पा. कार्यालयात, पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत असते.
गणेश मंडळाचे प्रतिनिधी / पदाधिकारी यांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता पडू नये तसेच याकामी मनपा कार्यालय व पोलीस स्टेशनला होणारी गर्दी टाळणेकामी आणि ऑनलाईन अर्ज व म.न.पा.मार्फत दिली जाणारी सेवा जलद गतीने मिळावी, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, श्री.शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून सन 2023 चे गणेशोत्सवासाठी मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकामार्फत तसेच पोलिस विभागामार्फत ऑनलाईन मंडप परवानगी मिळणेसाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आलेली होती. यामधून शहरातील सुमारे ५४९ गणेश मंडळांनी लाभ घेतला होता.
त्यानुसार नवरात्रोत्सवासाठीही अर्ज व मंडप परवानगीची प्रक्रीया राबविणेत येणार आहे. सदरची ऑनलाईन परवानगी प्रक्रिया महानगरपालिकेचे माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केली आहे.
*ऑनलाईन परवानगी प्रक्रियेची वैशिष्टये*
१) ऑनलाईन अर्ज करण्याची सोय
२) महानगरपालिका व पोलिस आयुक्तालयाचे दोन वेगवेगळया संकेतस्थळांवर अनुक्रमे म.न.पा. व पोलिस
स्टेशनला ऑनलाईन अर्ज करता येणार.
३) दोन्हीही संकेतस्थळे एकमेकांशी Interlink (जोडलेली) आहेत.
४) ऑनलाईन अर्ज व परवानगीही ऑनलाईन मिळणार.
याबाबतचा अधिकचा तपशील खालीलप्रमाणे.-
अ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे ऑनलाईन अर्ज व परवानगी.
१) महानगरपालिकेचे अधिकृत संकेत स्थळ www.pcmcindia.gov.in यावर नवरात्रोत्सव 2023 या लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधित मंडळास आपली नोंदणी करावी लागेल,
२) सदर नोंदणी करताना अध्यक्षांचा मोबाईल क्रमांक हा पुढील ओटीपी साठी वापरण्यात येणार आहे,
३) मंडळाच्या अंतर्गत येणारे महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व निवडणूक प्रभाग यांची नोंद केल्यानंतर संबंधित अर्ज क्षेत्रिय कार्यालयास प्राप्त होईल,
४) संबंधित क्षेत्रीय कार्यालयमार्फत पुढील प्रक्रियेसाठी तो अर्ज स्थापत्य व अतिक्रमण विभाग यांना ऑनलाईन प्रक्रिया द्वारे पाठवण्यात येईल आहे. अतिक्रमण विभाग व स्थापत्य विभाग त्यांचे ना हरकत दाखले ऑनलाईन पद्धतीने क्षेत्रीय कार्यालयालाकडे पाठवतील, अर्ज प्रक्रियेमध्ये नोंद करण्यात आलेल्या मंडपाचे आकारमान यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असता कामा नये, स्थापत्य व अतिक्रमण विभाग यांनी दिलेल्या ना हरकत दाखल्यांना अनुसरून महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय मंडळांना ऑनलाईन परवानगी देईल, सदरची ऑनलाईन परवानगी अर्जदारांना त्यांचे मोबाईल वर पाहता येईल.
५) महानगरपालिकेतर्फे दिली गेलेली ऑनलाईन परवानगी ही पोलिसांच्या लॉगिनला देखील पहावयास उपलब्ध असेल जेणेकरून मंडळांनी पोलीस परवानगीस अर्ज केल्यानंतर महानगरपालिकेची परवानगी मिळाली आहे की नाही याची खात्री पोलीस विभागाला ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
ब) पोलिस आयुक्त पिं.चिं.पोलिस आयुक्तालय यांचेकडे ऑनलाईन अर्ज व परवानगी.
१) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून नवरात्रोत्सव मंडळ याबाबत अर्ज करता येईल.
२) सदर अर्ज करताना मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे सचिव खजिनदार यांची सर्व माहिती फोटो सहित अर्ज प्रक्रियेमध्ये नोंद करावयाची आहे, मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर हे ओटीपी पाठवून निश्चित केले जाणार आहेत.
३) मंडळाने संबंधित पोलीस ठाणे निवडायचे आहे जेणेकरून सदर फॉर्म हा संबंधित पोलीस स्टेशनच्या लॉगिनला जाईल व तिथूनच त्या परिसरातील वाहतूक विभागाला तो वर्ग केला जाईल, वाहतूक विभाग ऑनलाईन पद्धतीने आपला अभिप्राय नोंदवून संबंधित पोलीस ठाण्याला तो अर्ज ऑनलाईन पध्दतीने परत वर्ग करेल.
४) पोलिसांकडून दिली जाणारी ध्वनी क्षेपणाची परवानगी देखील ऑनलाइन स्वरूपामध्ये उपलब्ध असेल, मंडळांना वाहतूक विभागाची परवानगी लाऊड स्पीकरची परवानगी ही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,
५) सदर परवानगीचा अर्ज करताना मंडळांना विसर्जन मिरवणुकीबाबत देखील माहिती अर्जामध्ये नोंदवावयाची आहे, संबंधित मिरवणुकीबाबत मंडळातर्फे जबाबदार पदाधिकाऱ्यांचे फोटो व पूर्ण माहिती उपलब्ध करून द्यायची आहे,
६) मंडळाचे देवीची मुर्ती विसर्जन हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कोणत्या घाटावर केले जाणार आहे याची नोंद करणे देखील आवश्यक आहे.
७) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाचे कार्यक्षेत्र हे पिंपरी चिंचवड शहर सोडून देखील आहे संबंधित नगरपरिषद नगरपालिका व ग्रामपंचायत यांना देखील सदर अर्ज ऑनलाईन प्रक्रिया द्वारे पाठवण्यात येणार आहेत,
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाना दिल्या जाणारी विविध परवानग्या या वेळेत व सुलभ पद्धतीने देण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा मानस आहे, तरी सर्व मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने दिल्या जाणा-या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन मा.महापालिका आयुक्त मा.शेखर सिंह तसेच मा.पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…