Categories: Uncategorized

लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रथम जयंती निमित्त चिंचवड मतदार संघात 775 गरजवंताला मदतीचा हात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मार्च) : चिंचवड मतदार संघामध्ये संजय गांधी योजना समिती चिंचवड विधानसभा, अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड, संजय गांधी योजना विभाग पुणे, मुळशी तहसील कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचवड मतदार संघामध्ये समाजातील विधवा महिला 340 ,अंध 40 ,अपंग 95, मूकबधिर 10 ,कर्णबधिर 10 , ,मतिमंद 10 ,घटस्फोटीत महिला 20 , जेष्ठ नागरिक 250 ,यांना चिंचवड मतदार संघाच्या आमदार अश्विनीताई जगताप व भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते पेन्शन पत्र वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे ,उमेश ढाकणे, पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रवीण ढमाले ,मंडल अधिकारी सुरेंद्र जाधव ,दिनेश नरवडे संजय गांधी योजना कार्यालयातील भीमाशंकर बनसोडे, रहाटणीच्या तलाठी कविता पाठक ,थेरगाव तलाठी हनुमंत चांदेकर, चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख काळुराम बारणे मा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सुरेश भोईर, अभिषेक बारणे, नगरसेविका सविता ताई खुळे, मा स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे विठ्ठल भोईर ,संदीप नखाते , पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम काळूराम नढे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते प्रवीण वाघमोडे, तानाजी बारणे ,नेताजी नखाते गणेश कस्पटे लक्ष्मण सुतार डॉ विष्णू जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप म्हणाले की पिंपरी चिंचवड नाही किंवा पुणे जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या चिंचवड मतदार संघातील शासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे व संजय गांधी योजना समिती मा अध्यक्ष गोपाळ माळेकर अध्यक्ष नरेंद्र माने, सदस्य आदिती निकम दिलीप गडदे संजय मराठे राजेंद्र पाटील चांगल्या प्रकारे काम करत आहेत म्हणूनच 775 लाभार्थ्यांना आज एकाच दिवशी मंजूर पेन्शन पत्र वाटप करण्यात आले तसेच आमदार अश्विनीताई जगताप म्हणाल्या की स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय मध्ये चालू केलेल्या कार्यालयामध्ये प्रकरण जमा केले जाते परंतु मंजुरीसाठी ते पुण्यामध्ये जाते कायमस्वरूपी पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय मध्ये कार्यालय सुरू करण्यासाठी शासन दरबारी मी प्रयत्न करणार आहे मागील दोन महिन्यांमध्ये दोन शिबिर भरवण्यात आले होते सर्व लाभार्थ्यांना या शिबिरामुळे एकाच दिवशी तलाठी ,मंडलाधिकारी महा-ई-सेवा केंद्र नायब तहसीलदार एकत्र आल्यामुळे सर्व तहसील उत्पन्न दाखले ,शासकीय योजनेचा लाभ घेत नाही प्रतिज्ञापत्र ,भाडेकरू संमती पत्र, दोन नावाची एकच व्यक्ती प्रतिज्ञापत्र ,रहिवासी प्रमाणपत्र, हे सरकारी पेपर जागेवर तयार करून मिळाले होते.

लाभार्थ्यांना कुठलाही पेपर साठी धावपळ करावी लागली नाही म्हणूनच आज पेन्शन पत्र घेताना प्रत्येक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते आणि आशीर्वाद देत होते लाभार्थ्यांसाठी सभागृह मा नगरसेवक कैलास थोपटे यांनी मोफत उपलब्ध करून दिले 1000 नागरिकांना जेवण्याची व्यवस्था शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने करण्यात आली होती याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब साळुंखे रणजीत भुमरे संजय भोसले विजय कांबळे तानाजी चौगुले बाळासाहेब पवार, विशाल माळी प्रशांत मोरे राजाभाऊ भंडारी ,प्रीती चौधरी कुंदा गडदे रेखा माने यांनी सहकार्य केले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago