आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त … नगरसेविका ‘माधवीताई राजापूरे’ यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना FASTag चे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : नॅशनल हायवेवरुन प्रवास करताना वाहनांवर FASTag असणं गरजेचं आहे. आता देशभरात सगळ्या टोल नाक्यांवर FASTag पद्धतीनेच टोल स्वीकारलं जात असून हे बंधनकारक झाले आहे. हे ओळखून आपल्या भागातील नागरिकांनाही तो सहज उपलब्ध होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग ३१ च्या नगरसेविका माधवीताई राजापूरे यांनी आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील नागरिकांना फासटॅग ( FASTag ) मोफत उपलब्ध करून दिला, नवी सांगवी-पिंपळे गुरव मधील अनेक चारचाकी वाहन धारक नागरिकांनी आज ( दि.२१ फेब्रुवारी ) याचा लाभ घेतल्याचे दिसून आले.

या फासटॅग मुळे प्रवाशाचा वेळ वाचेल व टोलनाक्यावरील गर्दी रोज होणार्‍या वादावादीही टळतील. हा त्यामागचा शासनाचा उद्देश आहे. शासनाने १५ फेब्रुवारी ही शेवटची मुदत देत सर्वच वाहन धारकाना फास्ट टॅग वापरणे सक्तीचे केल्याने पूर्वी अल्प प्रमाणात असलेले फास्ट टॅग वापराचे प्रमाण वाढून आता 65 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.जानेवारी 2021 पर्यंत टोल फासटॅग व रोख असे निम्मे निम्मे प्रमाण होते; परंतु 16 फेब्रुवारी 2021 पासून फास्ट टॅग वापरकर्त्याचे प्रमाण डबल झाले आहे.

या फास्टटॅग वाटपाच्या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना माजी स्थ्यायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापूरे म्हणाले “देशातील सर्व टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य करण्यात आलं आहे. FASTag नसल्यास वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. मात्र हे FASTag नेमकं आहे तरी काय? ते कसं काम करतं? ते कुठे मिळतं? असे अनेक प्रश्न अनेकांना सतावत होते, त्यामुळे आपल्या भागातील नागरिकांना ते जागेवरच उपलब्ध व्हावे, म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे.

तर वाहन चालक नागरिकांकरीता फासटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असून हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते आणि टोल प्लाझावर होणारी ट्रॅफिक जॅमची कटकटही कमी होण्यास मदत होईल. याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

22 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

6 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago