आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर व पल्लवी भोईर यांच्या मार्फत भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज : चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड परिसरातील महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर पल्लवी विठ्ठल भोईर यांनी केले होते . चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण येथे ही स्पर्धा संपन्न झाली . गालिचा रांगोळी, पोट्रेट रांगोळी पारंपरिक ठिपक्यांची रांगोळी या तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली . 85 हुन अधिक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला .स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात आला.

गालिचा विभाग
प्रथम :प्रज्ञा गवळी
द्वितीय : सागर मालगावे
तृतीय : लक्ष्मी कोकाटे

ठिपक्यांची रांगोळी विभाग
प्रथम : अंजली धस्के
द्वितीय : हेमा बांद्रे
तृतीय : सुजाता स्वामी

पोट्रेट विभाग
प्रथम : मेघा परमार
द्वितीय : गौरी करांडे
तृतीय : मीनल शेळके

सर्व प्रथम क्रमांकास पेशवाई पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी येवला पैठणी, तृतीय क्रमांकासाठी पैठणी सर्व स्पर्धकास आकर्षक बक्षीस देण्यात आले .

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शहराच्या महापौर सौ.माई ढोरे , महाराष्ट्र राज्य भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.उमाताई खापरे , नगरसेवक श्री.राजेंद्र गावडे , सुरेश भोईर ,बाबा त्रिभवन आरतीताई चौंधे मोरेश्वर शेडगे , उज्ज्वला गावडे योगेश चिंचवडे , सागर चिंचवडे , राहुल भोईर , रविंद्र देशपांडे , धनंजय शाळीग्राम , मधुकर बच्चे , अजित कुलथे या मान्यवरांच्या उपस्तिथीत संपन्न झाला . स्पर्धकांनी रेखाटलेल्या रांगोळ्या बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती . कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क व सोशल डिस्टनसिंगचे कटाक्षाने पालन करण्यात आले .

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago