भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळताना बहिण एक वाक्य उच्चारते – ” इडा पिडा जावो । बळीचे राज्य येवो ।। “

महाराष्ट्र 14 न्यूज : भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळताना बहिण एक वाक्य उच्चारते –

“इडा पिडा जावो । बळीचे राज्य येवो ।।”

आपल्या कडील पुरोगामी ह्या वाक्यात शब्दच्छल करून त्यातील बळी म्हणजे वामनाने पाताळात पाठवलेला विरोचन पुत्र बळी असा अर्थ सांगतात. याला तडका म्हणून बळी हा कशारितीने शेतकरी संस्कृतीतील होता अशा कथाही त्याला जोडतात.

सर्वप्रथम पुरोगाम्यांचा येथील दुटप्पीपणा हा आहे की, पुरोगामी इतर वेळी हिंदू पुराणांना भाकडकथा म्हणतात परंतु त्याच पुराणकथांमधील बळी, वामन ही पात्रे सत्य असल्याचे सांगत सुटतात. बळीच्या खांद्यावर नांगर असल्याचे फोटो तयार करून बळीला शेतकरी दाखवण्यामागे डाव्यांचा हेतू हा केवळ शेतकऱ्यांना ब्राह्मणविरोधी दाखवणे एवढाच असतो. बळीचा इतिहास शोधण्यासाठी पुरोगाम्यांकडे हिंदूंची पुराणे सोडून दुसरा कोणताही स्रोत नाही. त्याच स्रोतातून कथा उचलून त्याचाच वापर हिंदूंविरूद्ध डावे कसा करतात हे प्रत्येक हिंदूने बारकाईने अभ्यासले पाहिजे. वामनाने कपटाने बळीला पाताळात घातले हे सत्य डावे असे काही मिरवत असतात जणू काही पुराणांची रचना करणाऱ्या हिंदूंनी ते सत्य लपवून ठेवले होते आणि डाव्यांनी मोठा तपास करून त्यांचे कारस्थान शोधून काढले.

बळी हा शेतकरी असल्याचे कोणतेही उल्लेख पुराणांत मिळत नाहीत. उलट बळी हा वैदिकांप्रमाणेच यज्ञक्रिया करणारा असूरांचा राजा होता हा खरा इतिहास आहे. डाव्यांनी उभा केलेला बळी हा विरोचनपुत्र बळी अधिक श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बळीराम यांचे मिश्रण असून त्यात खोटे देखील मिसळलेले आहे.

महाभारतातील द्वारकेचा राजा बळीराम हा खांद्यावर नांगर घेतलेला दाखवलेला आहे. नांगर हे बलरामाचे आयुध होते व त्याच्या सहाय्याने तो युद्ध करत असे. तो शेती करत होता असे कोणतेही उल्लेख महाभारतात अथवा भागवत पुराणात मिळत नाहीत. केवळ बलरामाच्या हातात नांगर आहे म्हणून कुणी बलरामाला शेतकरी ठरवू पाहत असेल तर श्रीराम लक्ष्मणाच्या हातात धनुष्य आहे म्हणून त्यांना काय ठरवावे ? मुळात क्षत्रियांच्या हातातील शस्त्रे ही त्यांच्या युद्धपद्धतीची द्योतके आहेत. क्षत्रिय म्हणजे राज्यकर्ते लोक. त्यांनी राज्य सांभाळायचे की शेती करायची ? शिवाय चातुर्वर्णात राज्य करणारा क्षत्रिय आणि शेती करणारा वैश्य असे स्पष्ट वर्गीकरण करण्यात आले आहे व श्रीकृष्णानेही गीतेत तसेच म्हटलेले आहे.

डाव्यांनी हातात नांगर घेतलेला बलराम आणि विरोचन पुत्र बली यांची सरमिसळ करून विरोचन पुत्र बलीला शेतकरी दाखवले, जे धादांत खोटे आहे. विरोचन पुत्र बली हा भगवान विष्णूंचा अनन्य सेवक आहे. मात्र त्याने ९९ अश्वमेध यज्ञ केल्याने स्वर्गातील इंद्राचे सिंहासन अकाली धोक्यात आले म्हणून बळीला १००व्या यज्ञापासून रोखण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनरुपाने बळीला पाताळात धाडले. भगवंताच्या भक्तांना त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी त्यांना ते भगवंताच्या चरणांपुढे फिके वाटते.

मग बळी भगवंतांचा अव्हेर कसा करेल ? भगवान विष्णू आपल्याकडे आलेले पाहून बळी आनंदाने त्यांना सामोरा गेला आणि त्यांनी मागितलेली त्रिपाद भूमी मोठ्या मनाने त्यांना दान दिली. यावेळी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांना भक्तीचे मर्म लक्षात आले नाही. त्यांना केवळ दैत्यकुळाचे हित दिसत होते. म्हणून त्यांनी बळीला त्रिपाद भूमी दान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र बळीने देवासमोर गुरुआज्ञेलाही मानले नाही. भूमी दान देण्यापुर्वी हातात आचमण करण्यासाठी बळी कमंडलूतील पाणी घेऊ लागला असता शुक्राचार्य झारीत सूक्ष्मरुपाने दडून बसले. तेव्हा बळीने दर्भाच्या काडीने गुरूचा डोळा फोडला.

याचे अत्यंत सुंदर वर्णन तुकोबांनी एका अभंगात केले आहे. देवाची प्राप्ती होत असेल तर माणसाने ते गुरुंचे वचनही मानू नये जे त्याला देवापासून दूर घेऊन जाते. बळीने हेच केले.

न मानावे तैसे गुरूचे वचन । जेणे नारायण अंतरे ते ।।
आड आला म्हणोनि फोडियेला डोळा । बळीने आंधळा शुक्र केला ।। (संत तुकाराम गाथा)

बळी हा भगवान श्रीहरींचा अत्यंत लाडका भक्त आहे. म्हणून त्याला पाताळात धाडल्यानंतर देवाने त्याच्या पाताळातील राज्याचे द्वारपाल बनणे स्वीकारले. तसेच सध्याच्या इंद्राचे म्हणजे पुरंदराचे राज्य संपल्यानंतर पुढील इंद्रपद बळीलाच मिळणार असल्याचे वरदानही त्यांनी बळीला दिले. सात चिरंजीवांपैकी बळी हा एक चिरंजीव आहे आणि हे चिरंजीवपद देखील त्याला वामनानेच बहाल केले आहे.

आपल्या इकडील लाल डावी पुरोगामी माकडे मात्र मनाने काहीही भाकडकथा मांडून लोकांचा बुद्धीभेद करत असतात. असे करण्यामागे त्यांचा हेतू हा केवळ लोकांना त्यांच्या श्रद्धास्थानांपासून दूर करणे आणि समाजात जातीजातीत फूट पाडणे हा असतो. आत्तापर्यंत लाल बाटव्यांचा इतिहास हा अशाच प्रकारचा राहिला आहे. देशोदेशींच्या पुरातन संस्कृतींना भगदाडे पाडून सत्तेच्या पोळ्या भाजणे एवढाच डाव्यांचा अजेंडा आहे. जर तुम्हाला व्हॉटसॕपवर कोणी अशा प्रकारचे बुद्धीभेद करणारे मेसेज पाठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्याआधी पुराणे उघडून त्यातील सत्य पडताळून पहा आणि मगच विश्वास ठेवा. सत्तेच्या लालसेने पिसाळलेल्या पुरोगामी व डाव्या बाटग्यांना त्यांची जागा दाखवून देणे हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य आहे.

वामनमुर्ती त्रिविक्रमा । अगा ये सगुणा निर्गुणा ।। (संत तुकाराम गाथा)

[ हिंदू पुराणांची रचना करणारे मनूवादी (डाव्यांच्या दृष्टीने सगळे ब्राह्मण) जर बहूजनांचा इतिहास विकृत करणारे होते तर मग त्याआनी बळीचा इतिहास पुराणांमधून मांडण्याचीही आवश्यकता नव्हती. इतिहास मांडलाच नसता तर कपटही उघडे होण्याचा प्रश्न येत नव्हता. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यांनी इतिहास तरीही मांडला.]

✒️ गजानन जगदाळे पाटील

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago