Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मार्च) : पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चाच्या वतीने;मंगळवार दिनांक १४/०३/२०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून *पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उज्वला गणेश गावडे* उपस्थित होत्या, यांच्या हस्ते महिलांना सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीच्या अध्यक्षा सौ. राजश्री जायभाय, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. दिपाली धनोकार, शहर उपाध्यक्ष सौ. रोहिणी मांढरे, सौ. जयश्री खरमाडे, पिं. चिं. सोशल मीडिया प्रमुख सौ. हिना मुलानी, निगडी – चिखली मंडल अध्यक्ष सौ. कविता हिंगे, भोसरी – चऱ्होली मंडल सरचिटणीस सौ. सुरेखा पांचाळ, सौ. चित्रा अभंग, उपाध्यक्ष सौ. कल्पना पाटील त्याचबरोबर महिला मोर्चाच्या इतर पदाधिकारी महिला, प्रभाग अध्यक्ष, मंडल कार्यकारणी सदस्य व प्रभाग कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व आयोजन पिं. चिं.शहर महिला मोर्चा सरचिटणीस सौ. कविता भोंगाळे आणि भोसरी – चऱ्होली मंडल अध्यक्ष सौ. गीता महेंद्रु यांनी केले होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!