महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जून) : पंढरीची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे वैभव … ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा जयघोष करत लाखो वारकरी दिंडीसोहळ्यात सहभागी होतात. मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेने अनेकजण वारकऱ्यांची सेवा करत असतात.
पिंपरी चिंचवड मधील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली जाते, तशीच मोफत आरोग्यसेवा याही वर्षी पुरवण्यात आली. यात वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार देहू आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी महामार्गावर पुरविण्यात आले , यात दररोज हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला, ही सेवा देणाऱ्या सेवकांचा सत्कार (आज २९ जून) ला करण्यात आला.
यात आपल्या सेवेचे योगदान देणारे डॉ. संतोष कदम, डॉ. ऋषी महाजन, डॉ. देविदास शेलार, डॉ. प्रियांका बाजड तसेच चंद्ररंग पॅरामेडिकल चे विद्यार्थी व सर्व सेवकांचा सत्कार ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ व लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने श्री साई सेवा कुंज आश्रम, कासारवाडी येथे आषाढी एकादशी निमित्ताने करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ.देविदास शेलार म्हणाले, “पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेणे पुरेसे नसते. तर वारी अनुभवणे, वारकऱ्यांच्या संगतीत राहून त्यांची सेवा करत करत विठू नामाचा गजर करण्यात तल्लीन होणे, याची तुलना कुठल्याही सुखाशी होऊ शकत नाही. वारीत अखंड सहभागी होत, माझ्या सहकाऱ्यांसमवेत वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, आणि हे कार्य करताना मला प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचा आनंद मिळतोय, मलाही गेल्या वर्षी पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा डॉक्टर म्हणून पांडुरंगाच्या रूपातील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे, हे मी अहोभाग्य समजतो.”
महाराष्ट्राला वारीचे जे आकर्षण वाटते, ते विशेषत: संतांच्या पालख्यांमुळे. पूर्वीच्या काळी एखाद्याला पालखीपदस्थ करणे, हा सर्वांत मोठा सन्मान होता. आता तर लाखो वारकरी आणि त्यांचे कुटुंबीय यात सहभागी होतात. अगदी परराज्यातून, परदेशातून देखील उत्सुकतेपोटी अनेक जण वारीच्या प्रवासात येतात. या सर्वांचीच कुठल्याही प्रकारची आरोग्य समस्या येऊन गैरसोय होणार नाही याची काळजी लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवक त्यांच्या परीने घेत होते.पांडुरंगाच्या वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून करत असलयाचे ट्रस्ट चे अध्यक्ष शंकर जगताप
बंधू विजय जगताप यांनी सांगितले.यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, दत्त आश्रमाचे शिवानंद स्वामी महाराज, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शंकर जगताप, सुभाष दादा काटे, जयश्रीताई जगताप, मीनाताई काटे, विजू अण्णा जगताप, प्रकाश भाऊ काटे, उद्योजक विजय शेठ जगताप, ह भ प बभृहन महाराज वाघ, बाळासाहेब करंजुले, अरुण अण्णा काटे, रमेश काशिद , उद्धव कवडे , सखाराम रेडेकर, सुनील कोकाटे, दत्तात्रय जाधव, गिरीष पाटील आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, …