Categories: Uncategorized

संत निरंकारी मिशनच्या वतीने १३ मे हा दिवस सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना समर्पित – समर्पण दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे, २०२३) :संत निरंकारी मिशनच्या वतीने सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १३ मे हा दिवस प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी ‘समर्पण दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार असून त्याचा मुख्य कार्यक्रम सांय ५ ते रात्रि ९ या वेळात संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित केला जाणार आहे. या व्यतिरिक्त देशभरातील मिशनच्या विविध शाखा क्षेत्रीय आणि सेक्टर स्तरावर समर्पण दिवस समारोह आयोजित केले जाणार आहेत.

या निमित्ताने संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे विशाल रूपात समर्पण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या मध्ये हजारो भाविक भक्तगण सहभाग घेवून बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रति आपली श्रद्धा सुमने अर्पण करण्या बरोबरच त्यांच्या दिव्य शिकवणुकितून प्रेरणा प्राप्त करणार आहेत. पुणे झोन मध्ये १५ ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व विदित आहे, की बाबा हरदेवसिंहजी महाराज प्रेम, करूणा, दया व साधेपणाचे मूर्तिमंत स्वरूप होते. त्यांचे दिव्य रूप, सर्वप्रिय स्वभाव व विशाल अलौकिक विचार संपूर्ण मानवजातीच्या कल्याणार्थ समर्पित होते. त्यांनी मिशनची धुरा तब्बल ३६ वर्षे सांभाळली. त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे मिशनचा प्रचार १७ देशांपासून पुढे जाऊन प्रत्येक महाद्वीपातील ६० देशांमध्ये पोहचला. त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संत समागम, युवा सम्मेलने तसेच विविध समाज सेवांचे आयोजन या काही ठळक बाबी होत्या. त्यांच्या अमूल्य योगदानामुळे मिशनला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी बरोबरच अनेक पुरस्कारां द्वारेही सम्मानित करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघानेही निरंकारी मिशनला त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिषदचे सल्लागार म्हणून मान्यता प्रदान केली आहे.

बाबाजीनी मानवमात्राला केवळ ब्रह्मज्ञानाचा बोध प्रदान केला असे नव्हे तर जनसामान्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची शीतल, निर्मळ धारादेखील प्रवाहित केली. त्या बरोबरच निरंकारी इंटरनेशनल समागम (एन. आय. एस.) द्वारे विदेशामध्ये एकत्व व सद्भावनेची प्रेरणा देणारा संदेश आध्यात्मिकतेच्या माध्यमातून प्रसारित केला. बाबजीनी समाजाचे पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी अनेक परियोजना कार्यान्वित केल्या त्यामध्ये रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, महिला सशक्तिकरण इत्यादि प्रमुख आहेत.

‘द्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचे पूल निर्माण करावेत’ हे तथ्य जगासमोर कृतिशील रूपात प्रस्तुत करत त्यांनी एक नवा दृष्टिकोण मांडला, की जी कोणतीही रेखा दोन राज्ये किंवा दोन देशांना विभाजित करते ती त्या दोन राज्यांना किंवा देशांना जोडणारी रेषा असते. ‘मानवता हाच धर्म होय’, “विश्वबंधुत्व”, “एकोपा”, “एकत्वत्वात सद्भाव”, “भिंतिरहित विश्व”, “धर्म जोड़तो, तोड़त नाहीं“ इत्यादी सुंदर भावनांचा जगभर विस्तार केला.वर्तमान समयाला सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे सत्याचा संदेश विश्वभर पोहचविण्याचे सुंदर स्वप्न साकार करत असून हा दिव्य संदेश प्रत्येक मानवापर्यंत पोहचविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक निरंकारी भक्त आपले जीवन सार्थक करत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी… कोण होणार, चिंचवडचा आमदार ?

  महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…

22 hours ago

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

6 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

1 week ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

1 week ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

1 week ago