Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने … स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ मे २०२२) :  साहित्यिक, भाषा शुद्धी चळवळ चालवणारे कुशल संघटक, विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ, राजकारणी, कवी, वकील, कुशल वक्ते आणि विचारवंत अशा अनेक स्वरुपात समाजासमोर आलेले व्यक्तीमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय. अशा बहुआयामी व्यक्तीमत्वाचे जीवनचरित्र आपण अभ्यासले पाहिजे, असे प्रतिपादन  महापालिका सहाय्यक  आयुक्त रविकिरण घोडके  यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला महापालिका सहाय्यक  आयुक्त रविकिरण घोडके  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त घोडके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

       महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमावेळी   जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, महापालिका कर्मचारी  वासिम कुरेशी, दीपक पवार, संदीप बहिरट, शीतल पवार, मारुती मारणे, मानसिंग गायकवाड, हेमा शिंदे, अनिल घाडगे, सुरेश मोरे, लक्ष्मन तितकारे, दिलीप गावडे, पत्रकार प्रमोद गरड आदी उपस्थित होते.

          सहाय्यक  आयुक्त रविकिरण घोडके यांनी सावरकरांचा जीवनपट उलगडला. ते  म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली. काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते. मातृभूमीबद्दल असलेली तळमळ ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या काव्यातून सावरकरांनी  व्यक्त केली. अशा प्रतिभावंत व्यक्तीमत्वाचे जीवन आपण अभ्यासले पाहिजे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

4 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

5 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

6 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

7 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago