मराठवाडा जनविकास संघ पिंपळे गुरव यांच्या वतीने किल्ले स्पर्धेच्या निमित्ताने लहानग्यांच्या कलागुणांना वाव!

महाराष्ट्र 14 न्यूज : मराठवाडा जनविकास संघ पिंपळे गुरव यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने गड किल्ले स्पर्धा घेण्यात आली होती .या स्पर्धेत ऐकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सरस्वती अनाथ आश्रय दापोडी तर दुसरा क्रमांक सांगवी मधील शिक्षक सोसायटी तर तृतीय क्रमांक शांताराम बाईत प्रतिष्ठान यांनी मिळविला मराठवाडा जनविकास संघ मार्फत भव्य चषक मा.अरूण पवार (अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ) मा.रोहीदास बोऱ्हाडे(पोलीस नाईक) यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांना मेडल देऊन गौरविण्यात आले.

तसेच अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी गोड होण्यासाठी ब्लेकेट देण्यात आले. सर्व मुलांनी एकत्र फराळाचा आनंद घेतला. अरूण पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व शाळेमध्ये गड किल्लेंची सहल आयोजन करावे तरच मुलांना गड किल्ले ची जास्त माहिती मिळेल. आपण आपल्या परिसरात दिवाळी मध्ये किल्ले करावीत यावेळी राम पवार (सहा. पोलीस फौजदार), गणेश धामणकर (पोलीस नाईक), रवींद्र बाईत, ह.भ.प. पुरूषोत्तम वाघमारे (भैरवनाथ मंदिर पुजारी पिंपळे गुरव), कृष्णाजी खडसे (अध्यक्ष पितामह भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ),देविदास सुरवसे (अध्यक्ष सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम) मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago