Categories: Editor Choice

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या वतीने … माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’

महाराष्ट्र १४ न्यूज, (दि.२४ फेब्रुवारी २०२२) : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत नागरिक, विविध संस्थाआणि संघटनांनी  सहभाग नोंदवून आपल्या सृजनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकशाहीच्या बळकटीकरणास हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे देशातील प्रत्येक मताचे महत्व पटवून देणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.

‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेद्वारे सृजनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येक मतातील सामर्थ्याचा पुनरुच्चार करावयाचा आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मतदाराचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग स्वीप कार्यक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेतून जनतेच्या गुणांना आणि सर्जनशीलतेला आवाहन करतानाच त्यांच्या सक्रीय सहभागातून लोकशाहीला बळकटी दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा,गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा अशा पाच प्रकारच्या  स्पर्धांचे आयोजन भारत निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेअसून या  स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत. लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्व या विषयावर आधारित तयार केलेल्या संकल्पना आणि विचारांना प्रोत्साहित करणे, जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन लोकसहभागातूनलोकशाही व्यवस्था मजबूत करणे,हा या स्पर्धेचा उद्देश आहे. दि.१५ मार्च २०२२ पर्यंत या स्पर्धेचा कालावधी  आहे.

       राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धांचे वर्गीकरण करण्यात आले असून त्याची विभागणी संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी  अशा तीन श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक श्रेणीतीलविजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे याव्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीमध्ये विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके असतील.संस्थांच्या श्रेणीत ४, तर व्यावसायिक आणि हौशी स्पर्धकांच्या श्रेणीत ३ स्पर्धकांना विशेष उल्लेखनीय पारितोषिक देण्यात येणार आहे.

गीत स्पर्धेतसहभागीहोणारे स्पर्धक संबंधित विषयावर मुळ गीतरचना तयार करून शास्त्रीय, समकालीन, आणि रॅप इत्त्यादीसह कोणत्याही स्वरूपातील गीताच्या माध्यमातून त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरून तीन मिनिटांपर्यंत गाणे तयार करू शकतात. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना,संस्थात्मक श्रेणीत- प्रथम  पारितोषिक १ लाख रुपये , द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये , तृतीय पारितोषिक ३० हजार रुपये, तसेच विशेष उल्लेखनीय पारितोषिक १५ हजार रुपये, तर व्यावसायिक श्रेणीमध्ये- प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीयपारितोषिक३० हजार रुपये, तृतीय पारितोषिक २० हजार रुपये, तर विशेष उल्लेखनीय पारितोषिक १०हजार रुपयेआणि हौशी श्रेणीमध्ये – प्रथम पारितोषिक  २० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १०हजार रुपये, तृतीय पारितोषिक ७ हजार पाचशे रुपये तर विशेष उल्लेखनीय पारितोषिक ३ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत .

  व्हिडीओ मेकिंग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना निवडणुकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारी चित्रफित तयार करण्याची संधी मिळणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ,संस्थात्मक श्रेणीत- प्रथम पारितोषिक २लाख रुपये, द्वितीय पारितोषिक १लाख रुपये, तृतीय पारितोषिक ७५ हजार रुपये, तसेच विशेष उल्लेखनीय पारितोषिक ३० हजार रुपये तर व्यावसायिक श्रेणीमध्ये- प्रथम पारितोषिक ५०हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३० हजार रुपये, तृतीय पारितोषिक २०हजार रुपये, तर विशेष उल्लेखनीय पारितोषिक १० हजार रुपये  आणि हौशी श्रेणीमध्ये – प्रथम पारितोषिक ३० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २०हजार रुपये, तृतीय पारितोषिक १० हजार रुपये  तर विशेष उल्लेखनीय पारितोषिक ५ हजार रुपये  अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

  भित्तीचित्र स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक  डिजिटल भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तीचित्रे पाठवू शकतात. भित्तीचित्रांचे रेझोल्युशन चांगले असणे गरजेचे आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना संस्थात्मक श्रेणीत- प्रथमपारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३०हजार रुपये, तृतीय पारितोषिक२० हजार रुपये, तसेच विशेष उल्लेखनीय पारितोषिक १०हजार रुपये, तर व्यावसायिक श्रेणीमध्ये- प्रथम ३०हजार रुपये, द्वितीय रु.२० हजार रुपये, तृतीय१० हजार रुपये, तर विशेष उल्लेखनीय पारितोषिक ५हजार रुपये, आणि हौशी श्रेणीमध्ये – प्रथम पारितोषिक २० हजार रुपये, द्वितीयपारितोषिक १० हजार रुपये, तृतीयपारितोषिक ७ हजार पाचशे  तर विशेष उल्लेखनीय पारितोषिक३ हजार रुपये  रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

घोषवाक्यस्पर्धेत‘लेखणीतलवारीपेक्षा बलशाली आहे’ याची प्रचीती देणाऱ्या आणि लोकांना विचार करण्यासाठी आपल्या शब्दांच्या माध्यमातून प्रवृत्त करणाऱ्या स्पर्धकांना या स्पर्धेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक२० हजार रुपये,द्वितीयपारितोषिक१०हजार रुपये,तृतीय पारितोषिक७ हजार पाचशे रोख पारितोषिक तसेच सहभागी होणाऱ्यांपैकी५० स्पर्धकांना प्रत्येकी २ हजार  रुपये विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात येणार आहे. तर प्रश्नमंजुषा स्पर्धा ही  सुलभ, मध्यम आणि कठीण अशा तीन स्तरात संपन्न  होणार आहे. प्रत्येक स्तरासाठी २० बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे जास्तीत जास्त १०मिनिटाच्या आत देण्याचे आव्हान आहे. पुढील स्तरात जाण्यासाठी सहभागी स्पर्धकाला प्रत्येक स्तरावर २० पैकी किमान ७ प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेल्या वेळेत द्यावी लागतील.या स्पर्धेत मतदारांशी संबंधित मुलभूत आणि महत्वाची माहिती, मतदार यादी, एव्हिएम, व्हीव्हीपॅट, निवडणूक कायदा, आयटी अॅप्लीकेशन्स आणि भारतीय निवडणुकांच्या इतिहासाशी संबंधित प्रश्न असतील. स्पर्धेतील  विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरा स्तर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना

इ-प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

           स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त इतर विषयावर देखील व्हिडीओ बनवता येतील. त्यामध्ये माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्व (प्रलोभनमुक्त मतदान),मतदानाची शक्ती-: महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी महत्व प्रदर्शित करणेअशा विषयांचा समावेश आहे.सर्व प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत १५ मार्च२०२२  असून, प्रवेशिका voter-contest@eci.gov.inयावर पाठवण्यात याव्यात.राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध  स्पर्धांची सविस्तर माहिती देण्यासाठीhttps://ecisveep.nic.in/contest/हे स्वतंत्र  संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे, असे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे .

        दरम्यान, महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. तसेच विविध संस्था, संघटना, महिला बचत गट, महाविद्यालये, खाजगी दवाखाने/रुग्णालय, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक आस्थापना, हॉकर्स, मिळकतधारक, सर्व खाजगी आस्थापनांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

7 days ago