Categories: Editor Choice

Lonawala : तरुणील 14 लाख 90 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा

महाराष्ट्र १४ न्यूज, (दी.२३ फेब्रुवारी) : जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर खोटे प्रोफाइल तयार करून त्याद्वारे लोणावळा शहरातील एका अविवाहित नोकरदार मुलीला लग्न करण्याच्या नावाखाली तब्बल 14 लाख 90 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार लोणावळा शहरात घडला आहे . यातील आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे . नहुश प्रशांत म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे ( रा . करोद विमानतळ जवळ , ता . उरण , जि . रायगड ) असे या आरोपीचे नाव आहे . लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर स्वतःचे खोटे प्रोफाइल बनवून वेगवेगळ्या तरुणींना आर्थिक गंडा घालणाऱ्या या महाठगावर अशाच प्रकारचे तब्बल सात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत .

हे गुन्हे मुंबई , नवी मुंबई , ठाणे , रायगड , पिंपरी आणि पुणे याठिकाणी दाखल आहेत . मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी तरुणी ही अविवाहीत आहे . एप्रिल २०२१ मध्ये या तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर स्वतःचे प्रोफाईल बनविले होते . तेव्हा या प्रकरणातील आरोपीने नहुश प्रशांत म्हात्रे या नावाने मॅरेज प्रपोजल साठी फिर्यादी तरुणीला रिक्वेस्ट पाठवली . त्यानंतर फिर्यादी तरुणी व आरोपी यांची ओळख झाल्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीला लग्न करण्याबाबत विचारणा करीत तिचे स्थळ त्यास पसंत असल्याचे सांगितले .

विश्वास ठेवलेल्या तरुणीकडून आरोपीने एप्रिल २०२१ ते दिनांक १५/०२/२०२२ रोजी पर्यंत वेळो वेळी फोन करून वेगवेगळी कारणे सांगत तब्बल १४ लाख ९ ० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने प्राप्त केले . त्यानंतर संबंधित तरुणीने तिचे पैसे परत देणेबाबत आरोपीला फोन केला असता त्याने या तरुणीला शिवीगाळ करीत दमदाटी केली . याप्रकरणी लोणावळा पोलिसांकडून आरोपी नहुश प्रशांत म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे याच्याविरुद्ध भादंवि कलम ४१ ९ , ४२० , ५०७ , माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ ( ड ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . न्यायालयाकडून आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो . नि . सीताराम डुबल , सागर धनवे हे करीत आहेत .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

24 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago