आदिवासी महर्षी वाल्मिकी महादेव कोळी समाज संघटनेच्या वतीने …सामाजिक बांधिलकी जपत ११३ रक्तदात्यांनी पिंपळे गुरव येथे केले रक्तदान!

महाराष्ट्र 14 न्यूज : आदिवासी महर्षी वाल्मिकी महादेव कोळी समाज विकास संघटना यांच्या वतीने ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कोरोना आजारामुळे संस्थेने भव्य रक्तदान शिबीर घायचे ठरवले होते. माणुसकीच्या भावनेने पुजा , द्रव्य , दान , अन्नदान हे मोठे दान करतो पण यापेक्षाही रक्तदान हे श्रेष्ठ आहे हाच माणुसकीचा धर्म जपत युवकांनी जीवन हे रक्तावरच अवलंबून आहे. मानवी रक्त हे कोठेही कारखान्यात कृत्रिमरित्या तयार करता येत नाही . मानवी रक्त हे फक्त मानवाच्या शरीरातच तयार होत असल्याने त्याचा तुटवडा सातत्याने जाणवत आहे . या गोष्टीची जाणीव ठेवून हे शिबिर आयोजित केले गेले, यात ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले .

रक्तदान शिबीरामध्ये रक्तदात्यास चहा आणि बिस्किट ची व्यवस्था रक्तपेढीकडून करण्यात आली होती . रक्तदात्यास भविष्यात कधी रक्ताची गरज भासल्यास रक्तपेढी कडून १५ % आरक्षण असून रक्तदात्यास रक्ताची गरज भासल्यास यांच्याकडे असलेल्या प्रमाणपत्रावर एक रक्तपिशवी मोफत मिळेल व इतरांसाठी त्यांच्याकडे असलेल्या प्रमाणपत्रावर योग्य ती सवलत देण्यात येईल ही सवलत प्रमाणपत्र वापरेपर्यंत राहील, असे यावेळी सांगण्यात आले.

शिबिराचे उदघाटन उद्योजक ‘विजयशेठ जगताप’ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, सांगवी काळेवाडी मंडल भाजप चे सेक्रेटरी भाऊसाहेब जाधव, शिबिराचे आयोजक व भाजप युवा मोर्चाचे साई कोंढरे, कैलास बाबुराव रेडडे , अतुल पवार, सचिन पलांडे, सिद्धार्थ शिंगोरे, शुभम फरांदे, शुभम चंद, रोहित शिरसाट, चेतन तारू,सोमेश्वर झुमके, अक्षय पाटील, सोहम खंडी झोडे तसेच आदिवासी महर्षी वाल्मिकी महादेव कोळी समाज विकास संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago