Categories: Editor Choice

२६ मे २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना पिं. चिं. मनपाच्या या केंद्रांवर मिळणार…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२५ मे २०२१) : आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून ‘ कोविशिल्ड ‘ व ‘ कोव्हॅक्सिन ‘ लस उपलब्ध झालेली आहे . शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .२६ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही .

उद्या दि .२६ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील १६ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत १०० लाभार्थीच्या क्षमतेने ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे .

तसेच उद्या दि .२६ / ०५ / २०२१ रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे त्या फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या ४९ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे .

तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे .

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

9 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

10 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

20 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

20 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago