ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचा आकडा किती?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जुलै) : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही… त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं अजिबात टेन्शन नव्हतं…. मात्र तरीही काही विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत तर राज्यातल्या एकूण 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. परंतु निकाल जाहीर करताना आणि प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये देखील एक्झॅट अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा किती, याचा आकडा दिलेला नाही.

यंदाच्या वर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला असून, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखी तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यामध्ये काही हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

▶️विद्यार्थ्यांचे निकाल राखीव कसासाठी, नेमकं कारण काय?

4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. यात सर्वाधिक विद्यार्थी रिपीटर्स आहेत, ज्यांचे मागील 3,4 वर्षांच्या गुणपत्रिका तपासणे आवश्यक आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यांच्या आधीच्या निकालाच्या प्रती पडताळण्याचे काम सुरु असून, यानंतर या विद्यार्थांचे निकाल जाहीर होतील.

▶️957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के, 9 शाळांचा निकाल शून्य टक्के

दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. 12384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

18 hours ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

3 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

3 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

3 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

4 days ago