Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात घट सांगतेनंतर निर्माल्य थेट नदीपात्रात … आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ऑक्टोबर) : नवरात्र घट सांगतेनंतर दहा दिवसांचे निर्माल्य भाविक पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीत टाकण्यात धन्यता मानताना भाविक दिसत होते.

यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. सांगवी येथील बाबासाहेब आंबेडकर पुलावर आणि दशक्रिया घाटावर शहरातील अनेक ठिकाणी पुलावरून दिवसभर भाविकांनी निर्माल्य टाकले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक ना संस्था व ना महापालिकेचे कर्मचारी दिसत होते. यामुळे याला आळा बसला नाही. शहरात अनेक ठिकाणी पुलावरून नदीपात्रात निर्माल्य टाकण्यात आले.

स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेमार्फत पूर्वनियोजन करून या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्याची गरज होती. गणेशमूर्ती विसर्जन दिवशी ज्याप्रमाणे महापालिका नदी किनारी निर्माल्य गोळा करण्यासाठी व्यवस्था करते, त्याप्रमाणे महापालिकेने पवना नदी पुलावर निर्माल्य गोळा करण्यासाठी गाडी उभी करण्याची गरज होती. निर्माल्य गोळा करण्यासाठी कोणताही सामाजिक संस्था पुढे येत नाहीत. वर्षभर नदी प्रदूषणावर बोलणाऱ्या संस्था या दिवशी गायब होतात.

महापालिकेने घंटागाडीप्रमाणे या दिवशी प्रत्येक प्रभागात निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र गाडी फिरविणे गरजेचे आहेत. तसेच, नागरिकांनी या निर्माल्याची माती बागेत टाकावी, तसेच हार फुले, व पानाचे खत म्हणून उपयोग करावा. त्यामुळे नदी प्रदूषण होणार नाही. ज्या नदी पत्रात आपण मैलामिश्रीत पाणी सोडतो त्यामध्ये निर्माल्य टाकणे कितपत योग्य आहे याचा विचार भक्तांनी करावा … अनेक नागरिकांनी नदीच्या कठड्याजवळ निर्माल्य टाकले असल्याचे चित्र शहरात दिसून येत होते.

”पवना, मुळा नदी प्रदूषण होऊ नये म्हणून आपण जनजागृती करीत आहोत. नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहेत. नागरिकांना घट सांगतेनंतरचे निर्माल्य आपल्या घरातील बागेत व कुंडी टाकावे. पवना- मुळा प्रदूषण मुक्तीसाठी शहरातील सर्वांच्या सहकार्याची आवश्‍यकता आहे.”

राजू सावळे, (मनसे, पिं चिं शहर उपाध्यक्ष)

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

4 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

5 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

15 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

15 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago