Google Ad
Uncategorized

विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार निलेश भाऊ गायवळ यांचा अभिष्टचिंत सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मार्च) : आयुष्यमान भारत योजनेसह विविध सामाजिक उपक्रमांनी निलेश भाऊ गायवळ यांचा वाढदिवस साजरा करणार- प्रा.सचिन सर गायवळ खर्डा जिल्हा परिषद गटातील सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत  संवाद मेळावा पार पडला.

१६ मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांचा तालुक्यात आयुष्यमान भारत योजने सह विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करणार असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक सचिन सर गायवळ यांनी व्यक्त केले.
ते खर्डा येथील जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच यांच्या आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात बोलत होते.

Google Ad

ते बोलताना पुढे म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून असंख्य लोकांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, पाच लाख रुपयांची मदत लाभार्थ्यांना मिळणार आहे, त्यासाठी सर्व गावातील सरपंच, उपसरपंच यांनी यासाठी पुढाकार घेऊन घ्यावा त्यासाठी आमची यंत्रणा आपल्यासाठी उपलब्ध असून लाभार्थ्यांना मोफत कार्ड मिळवून देण्याचे काम करावे,तसेच आमच्या कुटुंबाने गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपत समाजातील अनेक घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे.

दुष्काळात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे तसेच कोरोना काळात औषधे,किराणा वाटप केले व समाजातील गोरगरीब, दिनदुबळ्या घटकांना त्या काळात हाताला काम नसताना लाखो रुपयांची मदत केली आहे, ते करत असताना समाजामध्ये सामाजिक जातीय सलोखा राखण्याचे काम आम्ही करत आहोत, यामध्ये कोणताही पक्ष भेद न करता सर्वच पक्षातील कार्यकर्ते बरोबर घेऊन पुढील काळात सामाजिक व राजकीय वाटचाल करणार असल्याचे प्राध्यापक सचिन सर गायवळ यांनी व्यक्त केले.

मा.निलेश भाऊ गायवळ यांचा अभिष्टचिंतन सोहळा साध्या पद्धतीने सोनेगाव येथे शेतातील फार्म हाऊस वर आयोजित करण्यात आला आहे,जामखेड तालुक्या सह खर्डा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी १६ मार्च रोजी गुरुवारी अभिष्टचिंत सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. सचिन सरांनी यावेळी शेवटी व्यक्त केले.
याप्रसंगी खर्डा, लोणी, बाळगव्हाण, पिंपळगाव आळवा, घोडेगाव,वाकी, सातेफळ, गुरेवाडी, नान्नज, महारुळी, वाघा, पिंपळगाव उंडा, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, जवळके, पोतेवाडी, चोबेवाडी, मुंजेवाडी, बोर्ले, इत्यादी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!