Google Ad
Editor Choice

नव्याने होणाऱ्या पिं.चिं. मनपा भवनासमोर लक्ष्मण जगताप यांचा भव्य पुतळा उभारावा, तसेच सभागृहात तैलचित्र लावण्याची माजी नगरसेवक जयंत उर्फ आप्पा बागल यांनी केली मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहराची पार्श्वभूमी भोसरी, पिंपरी चिंचवड, निगडी, आकुर्डी या ग्रामपंचायत माध्यमातून झाली तो पिंपरी चिंचवड नवनगर पालिकेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नावाने …

पिंपरी चिंचवड शहराची ७८ हजारावरील लोकसंख्या घनता आज मितीस ३० लाखांच्या उंबरठ्यावर उभी आहे ती आजच्या पिंपरी चिंचवड मनपा या नावाने…

Google Ad

स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. अण्णासाहेब मगर, स्व वसंतदादा पाटील, स्व. डॉ. श्री. श्री. घारे, स्व. प्रा. रामकृष्णजी मोरे, स्व. मधुकर पवळे, स्व. अंकुशराव लांडगे, स्व. नानासाहेब शितोळे प्रभृतींनी या शहराचे जडणघडणीत सिंहाचा वाटा उचललेला आहे.

मा. श्री. शरदराव पवार साहेब, मा. अनंतराव थोपटे साहेब, श्री. अजित दादा पवार, ना. देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी शहराचे पालकत्व सांभाळले.नुकतेच चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे पदावर असताना दि. ०३ जानेवारी २०२३ रोजी दुःखद निधन झाले. पदावर असल्याने व त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने शासकीय इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच लक्ष्मण भाऊंनी १९८६ पासून यांनी युवावस्थेत प्रथमच पिंपरी चिंचवड मनपाचे लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात प्रवेश केला २१ वर्षे भाऊंनी विविध पदावर आरुढ होऊन महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे माध्यमातून अनेक योजना, प्रकल्प, नागरी सुविधा पाकरिता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना समवेत घेऊन शहराचा रचनात्मक परंतु दूरदृष्टी ठेवून विकासाचा आलेख वाढविला पुढे विधानपरिषद, विधानसभा यांचेही ते सभासद झाले. आपल्या नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदार या पदांना खन्या अर्थाने त्यांनी न्याय दिला. त्या पदांची उंची वाढवून विविध योजना प्रकल्प कार्यान्वित केले.

लक्ष्मण जगताप हे महापालिकेचे महापौर होते. तसेच आजमितीसही ते आमदार होते. त्यांचे राजकीप पटलावरील शहरासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणारे असून भविष्यातील नव्या सदस्यांना ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे. म्हणून या अनुषंगाने नव्याने होणाऱ्या मनपा भवनासमोर लक्ष्मणभाऊ जगताप यांचा भव्य पुतळा उभारावा तसेच पिं.चिं. मनपाच्या सभागृहात भाऊंचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन जयंत उर्फ आप्पा बागल मा. नगरसेवक, पिं.चि. मनपा सचिव, महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!