Google Ad
Uncategorized

शहराला नवीन कारभारी … पिंपरी चिंचवडच्या भाजप शहराध्यक्षपदी लोकनेते लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे मावळते शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केली आहे.

आमदार महेश लांडगे यांचा शहर अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहराला नवीन कारभारी मिळणार याबाबतची चर्चा सुरू होती. त्यामध्ये निष्ठावान की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच शहराध्यक्ष पदासाठी शंकर जगताप यांचे नाव चर्चेत होते. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे

Google Ad
Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!