NEET UG चं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार ; जुलैमध्ये परीक्षा ?

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.०४ एप्रिल) : NEET UG 2022 – देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या NEET UG परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार याची शक्यता आहे.

शैक्षणिक सत्र 2022-23 साठी UG परीक्षा जुलैमध्ये होणार असल्याचंही समजतंय. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. NTA लवकरच परीक्षेची अधिकृत माहिती जाहीर करू शकते. अशा परिस्थितीत उमेदवारांनी अधिकृत पोर्टलला nta.ac.in भेट देत राहण्याचा सल्ला दिला गेलाय.

नीट यूजीसाठी (NEET UG Application Process 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर MBBS आणि BDS अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार NEET, neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीट यूजी परीक्षेद्वारे एमबीबीएससाठी 2022 मध्ये 90,825, बीडीएस 27,948, आयुष 52,720, बीव्हीएससी आणि एएच 603 जागांसाठी प्रवेश घेतला जातो. यामध्ये 1,899 एम्स आणि 249 JIPMER जागांचा समावेश आहे.

🔴वयोमर्यादेत बदल

नॅशनल मेडिकल कमिशननं (NMC) NEET परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची उच्च वयोमर्यादा रद्द केलीय. यापूर्वी अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे ठेवण्यात आली होती, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 30 वर्षे होती.

🔴या’ कागदपत्रांची आवश्यकता

-पासपोर्टची स्कॅन केलेली प्रत आणि उमेदवारांचा पोस्टकार्ड आकाराचा फोटो

-इयत्ता 10 वी आणि 12 वीची मार्कशीट

-उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)

-विद्यार्थ्यांच्या डाव्या अंगठ्याच्या ठशाची स्कॅन केलेली प्रत

-वैध सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळ

खपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी)

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

17 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago