Categories: Editor Choice

मिशन- २०२२ : आमदार अण्णा बनसोडे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा ‘गनिमी कावा’ ; जनसंपर्क कार्यालयात शहर पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ ऑक्टोबर ) :    पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला घेरण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ‘गनिमी कावा’ केला आहे. बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरूवारी झालेल्या प्रमुख शिलेदारांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी वज्रमूठ बांधल्याचे दिसले.

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझमभाई पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका माई काटे, नगरसेवक रोहितआप्पा काटे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, ॲड. संदीप चिंचवडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील स्थानिक नेत्यांना एकजुटीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निवडणूक मोर्चेबांधणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात चर्चा केली. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, विकासकामांतील ढिसाळपणा आणि शहरात वाढलेले विद्रुपिकरण आदी विविध विषयांवर सत्ताधारी भाजपाला घेरण्याची रणनिती या बैठकीत आखण्यात आली.

शहरातील भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाचे आमदार आहेत. पिंपरी मतदार संघात राष्ट्रवादीचा ऐकमेव आमदार आहे. भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजपा सर्व शक्तीनिशी मैदानात उतरणार आहे. मात्र, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी पिंपरी विधानसभा ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी ताकद तुलनेतने पिंपरीत जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता काबिज करण्यासाठी पिंपरी मतदार संघ पर्यायाने आमदार अण्णा बनसोडे यांची मोठी मदत होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

3 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

16 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

17 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago