Categories: Editor ChoicePune

पुणे मेट्रोवरुन राष्ट्रवादी-फडणवीस आमने सामने … पुण्यात काय म्हणाले फडणवीस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ऑगस्ट) : पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पुणे मेट्रोवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं बोललं जात आहे. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजीनगर परिसरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टॉमॉडेल स्टेशनचं एक चांगलं उदाहरण असल्याचं फडणवीस म्हणाले. सगळ्या प्रकारचं काम इथं पाहायला मिळत आहे. अतिशय वेगानं महामेट्रोनं काम केलं आहे. मी महामेट्रोचं अभिनंदन करतो. 2016 ला मोदी सरकार आणि राज्य सरकारने या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर वेगानं हे काम होत आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना इथं पाहायला मिळेल. कोरोनामुळे कदाचित थोडा उशीर होईल, अशी शक्यताही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते ट्रायल रनचं उद्घाटन झालं. पण काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होईल. त्याला कुणी विरोध करणार नाही, असा दावाही फडणवीसांनी केलाय. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा याला खूप विरोध होता. पण आता काम पुढे जात आहे. मेट्रोच्या पुढच्या कामांना केंद्राकडून लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल, निधी मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

7 days ago