महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील बांधकाम व्यावसायिक संजय शितोळे यांनी सायकलवरून लंडन ते पॅरिस हा प्रवास २४ तासांत पूर्ण केला. लंडनमधील टॉवर ब्रिजपासून सुरू केलेले सायकलिंग दुसऱ्या दिवशी आयफेल टॉवर येथे संपले. निवडलेला घाटांचा रस्ता, कडकडीत गारठा, शेवटचे दोन तास पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ब्रिटिश व जर्मन सहकाऱ्यांसोबत त्यांनी हे अंतर पूर्ण केले.
शितोळे म्हणाले, “लंडन ते ग्रीनविच, केंट, अॅशडाऊन फॉरेस्ट या चढऊताराच्या नितांत रमणीय रस्त्याने घाम काढला. इंग्लिश चॅनेल न्यूहेवन येथून फेरी बोटीने पार करायला पाच तास लागले. फ्रान्समधील डीपी बंदरावर इंग्रजी न कळणाऱ्या फ्रेंच इमिग्रेशन ऑफिसरबरोबर वादावादीने ३० मिनिटे वाया गेली. पुढील प्रवास सोमे व्हॅली, नॉर्मडी या महायुद्धातील अनेक थरारक प्रसंगातील साक्षीदार असलेल्या निसर्गरम्य भूमीतून होता पण वेळेचे बंधन व चढ उताराने कस लागला. पॅरिसच्या उपनगरातून आयफेल टॉवरचे टोक पाहिल्यावर आनंद झाला.
शिल्लक ४५ मिनिटे वेळ व जीपीएस दहा किलोमीटर अंतर दाखवत होते. पाऊस जोरदार पडत होता. मात्र, प्रयत्नपूर्वक मन व श्वासाची लय जोडली गेली व आयफेल पॅरिस संजय शितोळे देशमुख यांनी लंडन ते पॅरिस हा ३३० किलोमीटर २४ तासात सायकलवरून पूर्ण केले.
पाऊस थांबत आला होता पण डोळ्यातून अश्रूधारा बरसत होत्या.” संजय शितोळे देशमुख हे लंडनमधील अनेक संस्थांशी संबंधित आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील व युरोपमधील सर्वोच्च शिखरे पार केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सायकल मोहिमा केल्या आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…