Categories: Uncategorized

कासारवाडीत माऊली प्रतिष्ठानतर्फे नमो चषक जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जानेवारी) : कासारवाडीतील माऊली प्रतिष्ठानतर्फे नमो चषक जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन राज्याचे माजी राज्यमंत्री मा. संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार सौ. उमाताई खापरे आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हस्ते शनिवारी संध्याकाळी झाले.

आजचे युवक हेच देशाचे वर्तमान व भविष्य आहेत. युवकांमध्ये संघ भावना व खिलाडीवृत्ती वाढीस लागावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात “नमो चषक 2024” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कबड्डीपटूंना शंकर जगताप यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री. सदाशिव खाडे, माजी सत्तारुढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके, भाजपचे शहर सरचिटणीस श्री. राजू दुर्गे, माजी उपमहापौर श्री. केशव घोळवे, माजी नगरसेवक माऊली थोरात, सौ. शैला मोळक आदी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था यांना गणपती उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी दि.१९ ऑगस्ट २०२५:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वपूर्ण निर्णय! जाणून घ्या…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 ऑगस्ट -- देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार…

1 day ago

मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा …. खडकवासला, पानशेत, वरसगाव व पवना धरणातून विसर्ग

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १८/०८/२०२५ व १९/०८/२०२५ रोजी सकाळी पावसाचे प्रमाण व खडकवासला पानशेत, वरसगाव…

2 days ago