माझं आरोग्य : फिट राहायचंय ? तर मग आहार आणि व्यायामाचं असं करा नियोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं आरोग्य
आहार घेणं क्लिनिकल एक्सरसाइज , लाइफस्टाइल अँड वेट मॅनेजमेंट एक्सपर्ट नियमित व्यायाम करत असाल , तर शरीराच्या गरजा निराळ्या असतात . खर्च होणाऱ्या कॅलरी भरून काढण्यासाठी व्यवस्थित व्यायाम करणं गरजेचं आहे . तुम्ही नीट खाल्लं नाही , तर शरीर व्यायाम करताना साथ देणार नाही . वर्कआउट यशस्वी रीतीनं पूर्ण करण्यासाठी आपण काय खातोय याकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे . कर्बोदकं आणि प्रथिनंयुक्त आहार घेतला , तरच तुम्ही पूर्ण ताकदीनं व्यायाम करू शकाल . व्यायाम आणि आहारामधूनच फिटनेस राखता येतो .

पोळी , भात , पास्ता , ब्रेड , फळं आणि सर्व प्रकारच्या भाज्या . प्रथिनं ( प्रोटीन ) कशातून मिळतात ? मटण , चिकन , मासे , अंडी , सोया आणि सर्व दुग्धजन्य पदार्थ ( कंबरपट्ट्याची गरज कधीच भासू नये , यासाठी करा हे सोपे व्यायाम प्रकार ) कर्बोदकं अतिशय महत्त्वाची ! कर्बोदकं शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात . खेळाडूंसाठी कर्बो दकंयुक्त आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे . प्रथिनं कर्बोदकांबरोबर काम करत शरीर अधिक सुदृढ आणि आरोग्यदायी बनवतं . तुम्ही वेट ट्रेनिंग घेत असाल , तर शरीराला जास्त प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते ; पण अति प्रमाणात प्रथिनांचं सेवन केल्यास शरीराला त्रास होऊ शकतो . अति प्रमाणात प्रथिनं शरीरात गेल्यास किडनीशी निगडित समस्या उद्भवू शकतात . व्यायाम करताना शरीर ऊर्जादायी असणं आवश्यक आहे . त्यामुळे व्यायाम करण्याअगोदर दोन – तीन तास पोटभर खाऊन घ्या . म्हणजे व्यायाम करताना शरीर क्रियाशील आणि मन उत्साही राहील . सर्व त- हेची पोषणतत्त्वं असलेला आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे . ओट्स , चिकन सँडविच , सलाड सँडविच , पास्ता , दूध किंवा व्हीट ब्रेड हे अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतात .

.. व्यायाम करण्याआधी खूप खाल्लं , तर वर्कआउट करताना आळस येऊ शकतो ; पण काहीही न खाता व्यायाम केला , तरीही त्याचा हवा तो परिणाम साधता येणार नाही . व्यायाम करण्याच्या एक तास अगोदर शक्यतो काहीही खाणं टाळावं , कारण पचनक्रिया सुरू असताना व्यायाम करणं अवघड जातं . लगेचच भरल्यापोटी व्यायाम करणंही जड जातं . कर्बोदकं आणि प्रथिनं यांचं ४ : १ अशा प्रमाणात व्यायामानंतर आहार घ्यावा . खर्च झालेली ऊर्जा भरून निघण्यासाठी काही तरी खाणं अतिशय महत्त्वाचं आहे . व्यायाम केल्यानंतर ४५ मिनिटांच्या आत तुम्ही खायला हवं . ही पोषणतत्त्वं शोषून घेण्यासाठीची सर्वोत्तम वेळ असते . वर्कआउटनंतर सफरचंद , केळं आणि सुकामेवा असा पौष्टिक आहार घेण्यास प्राधान्य द्या . बिस्किटं , चॉकलेट आणि कँडी असं अर्बटसरबट खाणं टाळावं . व्यायाम करताना घाम येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं . त्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे . व्यायाम करण्याआधी , करताना आणि केल्यावर पाणी प्यायला हवं . एक तासापेक्षा जास्त वेळ सचोटीनं नियमित व्यायाम करत असाल , तरच स्पोर्ट्स ड्रिंक्स म्हणजे विशेष पेयं घेण्याला प्राधान्य द्या . साठ मिनिटांपेक्षा कमी वेळ व्यायाम करत असाल , तर | स्पोर्ट्स ड्रिंक्सची आवश्यकता नाही . स्पोर्ट्स ड्रिंक्स खेळाडूंसाठी तयार केलेली असतात . त्यात इलेक्ट्रॉलाइट्सचं ( सोडियम आणि पोटॅशियम ) प्रमाण जास्त असतं .

-नमिता जैन

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago