माझं राशी भविष्य : सोमवार,७ डिसेंबर २०२० – असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : ( माझं राशी भविष्य ) सोमवार, ७ डिसेंबर – असा असेल आजचा दिवस

🔴मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. कामात अस्थिर स्थिती असेल, ज्यामुळे नोकरी बदलली पाहिजे असे मनाला वाटेल. व्यवसायात चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आज रोमँटिक मूडमध्ये असाल आणि प्रिय व्यक्तीसह आनंदी भविष्याची स्वप्ने सजवाल. वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती असेल. कामात यश मिळविण्यासाठी भाग्यची साथ मिळेल. वरिष्ठांचा सल्ला पुढे जाण्यास मदत करेल. आनंदाने प्रत्येक काम कराल.

🔴 वृषभ – आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात आनंद राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य देखील मदत करेल, ज्यामुळे कामात चांगल्या संधी उपलब्ध होतील. सोबत काम करणार्‍यांशी चांगले वागल्यानेच यशाचा मार्ग दिसेल. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्तता मिळेल. प्रेमसंबंधात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य किंचित कमजोर राहील. धनप्राप्तीचे योग आहेत.

🔴मिथुन

आजचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल आणि जोडीदाराशी नाते चांगले राहील. स्वतःची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. अनेक कामे करण्याचे मनात येईल, ज्यामुळे मनात संभ्रम निर्माण होईल. मित्रांची साथ मिळेल. नोकरीत यश मिळेल आणि कुठेतरी प्रवासाला जाण्याचे योग आहेत. बहुप्रतिक्षित धनलाभ होण्याचे योग आहेत.

🔴कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल, अन्यथा अस्वस्थ होऊ शकता. उत्पन्न देखील वाढेल, काही कारणामुळे आज धनप्राप्ती होऊ शकते, ज्याची आपण अपेक्षा केली नव्हती. यातून बचत देखील होईल. कौटुंबिक खर्चाकडे लक्ष द्याल. कामात विरोधकांचा सामना करावा लागू शकतो, परंतु कार्यक्षमतेच्या बळावर त्यांना नियंत्रित ठेवाल. लव्ह लाइफ आनंदी राहील. वैवाहिक लोकांसाठी दिवस आनंद देणार आहे.

🔴सिंह – आजचा दिवस अनुकूल आहे. आज प्रत्येक काम मजबूतीने कराल. मन आनंदी होईल, कारण प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. भविष्याबद्दल विचार कराल. वैवाहिक जीवनासाठी चांगला दिवस आहे. एकमेकांना समजणे सोपे होईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. कोणत्याही आव्हानाची भीती वाटणार नाही. नोकरीत क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल.

🔴कन्या
आजचा दिवस धावपळीचा आहे. कौटुंबिक वातावरण त्रासदाय ठरेल, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे थोडा आनंद होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम ठरणार आहे, प्रिय व्यक्तीशी बोलण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. उत्पन्न कमी होऊ शकते. कामाचे कौतुक होईल. आरोग्य बळकट होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस मध्यम आहे. जोडीदारावरील प्रेम वाढेल.

🔴तुळ
आजचा दिवस अनुकूल असल्याचे संकेत आहेत. उत्पन्नही वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंद देईल आणि सर्वजण एकमेकांची काळजी घेतील. प्रेमसंबंधात देखील चांगले परिणाम मिळतील आणि प्रिय व्यक्ती तुम्हाला गोड बोलण्याने आनंद ठेवेल. वैवाहिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील लहानांचे आरोग्य चिंता देऊ शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. कामावर लक्ष केंद्री करणे आणि सोबत काम करणार्‍यांवर विश्वास ठेवल्याने फायदा होईल.

🔴वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. नोकरीत काळजीपूर्वक काम करावे लागेल, तरच यश मिळेल. रखडलेल कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील. नात्यात आपलेपणा वाढेल. पैशाशी संबंधित लाभ होण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो, म्हणून काळजी घ्या. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी महत्त्वपूर्ण करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नाते दृढ होईल.

🔴धनु
आजचा दिवस उत्तम ठरणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे मन आनंदी होईल. उत्पन्न देखील वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी चांगले वागा. खाण्यापिण्याची काळजी घ्या, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. प्रिय व्यक्तीचा मूड बिघडल्याने थोडे दु:खी व्हाल, परंतु संध्याकाळपर्यंत त्यांना पटवू शकता आणि सर्व काही सामान्य होईल.

🔴मकर
आजचा दिवस थोडा नाजूक आहे. आजारी पडू शकता, म्हणून आरोग्याची काळजी घ्या. खर्चही वाढू शकतो. काळजी घेतल्यास मानसिक दबाव कमी होईल. कामात चांगले परिणाम मिळतील आणि कामाचे कौतुक होईल. बॉससुद्धा खूश होईल. उत्पन्न वाढेल. पैशांच्या गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात चांगला दिवस आहे, जोडीदार काहीतरी चांगले बोलेल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागेल. आपल्याच लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो.

🔴कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे. आज खूप मेहनत कराल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न वाढेल. काही नवीन संधी हाती येऊ शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होईल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. वैवाहिक जीवनही प्रेमाने परिपूर्ण होईल. कौटुंबिक वातावरण आनंद देईल. प्रत्येक गोष्टीत यश मिळू शकते, म्हणून दिवसाचा पुरेपूर फायदा घ्या.

🔴मीन
आजचा दिवस धावपळीचा आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल, अन्यथा अडचणी येऊ शकतात. विरोधक थोडे मजबूत होतील. भाग्याची थोडी साथ मिळेल, ज्यामुळे काही कामे होतील आणि जीवनात पैसा येईल. आरोग्य कमजोर होऊ शकते, ज्यामुळे आजारी पडू शकता. घरातील ज्येष्ठांचे आरोग्यही कमजोर होऊ शकते. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. विवाहित लोकांना जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. यामुळे गैरसमज दूर होतील आणि नाते सुंदर होईल.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago