माझं आरोग्य – डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये

 

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं आरोग्य – डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्‍यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात,

🔴1. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या : जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुवतपणा येण्याची शक्‍यता असते.

🔴2. आंबट व बेरी प्रकारातील फळे : जीवनसत्व क हे आंबट फळे जसे आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादीमध्ये तसेच स्ट्रॉबेरी, शृजबेरी, रासबेरी मध्ये पण असते. सर्वसाधारणपणे संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून ही जीवनसत्वे सैनिकासारखे आपले रक्षण करत असतात. डोळ्यांच्या संसर्गापासून रक्षण व मोतीबिंदूची शक्‍यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम क जीवनसत्व करते.

🔴3. सुका मेवा : ई जीवनसत्व हे अँटीऑक्‍सिडंट्‌सचे काम करते. जीवनसत्व अ चे ऑक्‍सिडेशन होण्यापासून वाचवते. आपण जसे घर घासून पुसून साफ करतो, किटाणूंचा कचऱ्याचा सफाया करतो, तसेच हे अँटीऑक्‍सिडंट्‌स फ्री रॅडीकल चा सफाया करतात. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया, हवेचे प्रदूषण, सिगारेट ओढणे इत्यादींमुळे फ्री रॅडीकल्स तयार होतात. बदाम, अंड, वनस्पतीजन्य तेल इत्यादी मध्ये ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते.

🔴4. पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्यांमध्ये अम्प्युटीन, झॅकसंथीन हे अँटीऑक्‍सिडंट्‌स भरपूर प्रमाणात असतात. स्नायूंच्या ऱ्हासाची व मोतीबिंदूची शक्‍यता कमी करण्यात यांचा महत्वाचा वाटा आहे. स्नायूंचा ऱ्हास ही सर्व वयस्क लोकांमध्ये आढळून येणारी अवस्था आहे. रेटीनाचा मधला भाग काम करेनासा होतो. हे टाळण्यासाठी भरपूर पालेभाज्या मिक्‍स असलेले सलाड खाणे आवश्‍यक आहे.

🔴5. अंडे – अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कॅरोटीन व ल्युपिन हे दोन्ही डोळ्यांसाठी आवश्‍यक असलेले पोषणमूल्य असतात. त्यामुळे रेटीना तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

🔴6. मासे – ट्युना, साल्मन इत्यादी प्रकारचे मासे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यासाठी हे मासे, तसेच आक्रोड, सोयाबीनची उत्पादने, या सगळ्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा जातो. डोळे तजेलदार दिसतात.

🔴7. झिंक – झिंक हे खनिज मदतनिसाचे काम करते. आपल्या यकृतात साठवलेले जीवनसत्व अ यकृताकडून डोळ्याच्या रेटीना पर्यंत आणण्याचे काम झिंक हे खनिज करते. काही फळे, भाज्या व मुख्यत्वे प्राणिज पदार्थ व मासे यात झिंक असते.

🔴समतोल आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, स्वच्छता तसेच पोषकतत्वांचा आहारात समावेश करण्यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

🔴डोळ्यासाठी उन्हाच्या चष्म्याचा वापर करा. फॅशन म्हणून नव्हे, तर सुर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल वापरावा.

🔴भरपूर पाणी प्यावे. आपला डोळा पाण्यासारख्या पदार्थाने वेढलेला आहे. आपण जितके वेळा पापणी उघडझाप करतो, तितके वेळा धुळीचे कण व इतर गोष्टी डोळ्यात जात असतात पण हा पातळ पदार्थ आपल्या डोळ्याचे सतत रक्षण करत असतो व डोळ्याला कोरडेपण जाणवू देत नाही.

🔴भडक रंगाच्या भाज्यांचे सलाड आहारात नक्कीच असावे. जसे पालक, बीट, कोथिंबीर, गाजर इ. हे सलाड अनेक गोष्टी एकत्र करून खावे. उदाहरणार्थ भाजी + फळे + थोडा सुकामेवा + कडधान्य + ऑलिव्ह तेल इत्यादी एकत्र खावे.

🔴डोळ्यांना कटाक्षाने आराम द्यावा. यासाठी 20-20-20 चा नियम पाळावा. दर 20 मिनिटांनी 20 फुट लांबीची वस्तू, 20 सेकंदांसाठी पाहावी यामुळे काम करताना डोळ्यावर येणारा ताण हलका होतो व डोळ्याचे आरोग्य राखले जाते.

( टीप :- डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. )

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

17 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago