Agriculture News

माझी शेती : निराशेच्या वातावरणात नवी उमेद देणारी नागपूर जिल्ह्यातील ‘सेवी थंगवेल’ यांची खजूर शेती …

महाराष्ट्र 14 न्यूज ( माझी शेती ) : कोरोनामुळे अवघा देश लॉकडाऊन होता, पण या संकटातही आपला बळीराजा शेतात राबराब राबत होता. त्यामुळेच घरात लॉकडाऊन असलेल्या शहरातील जनतेला फळं, भाज्या आणि दूध सहजतेनं मिळत होतं. म्हणूनच कोरोनाच्या या युद्धात शेतकरीही कोरोना योद्धा म्हणून लोकांना अत्यावश्यक बाबी पुरवत होता. कोरोनाच्या संकटातंही लाखो शेतकऱ्यांप्रमाणे ते शेतात राबले आणि आता त्यांच्या खजुराचं पीक विक्रीला आलंय. दोन एकरात आठ लाख रुपये उत्पन्नाचा विश्वास त्यांना आहे. महाराष्ट्रातील ही पहिली खजूर शेती आहे.

‘सेवी थंगवेल’ यांनी 2009 मध्ये दीड एकरात खजुराच्या 130 झाडांची लागवड केली. त्यांना चार वर्षानंतर उत्पादन सुरु झालं. दरवर्षी 8 ते 10 लाखांचे उत्पन्न अपेक्षित असून हे 70 वर्षे चालणारे पीक आहे. हवामान बदल, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा बिकट परिस्थितीत योग्य नियोजन करुन, सेवी थंगवेल यांनी नागपुरात खजूर शेती करुन दाखवली. गेल्या अनेक वर्षांपासून या शेतीतून लाखो रुपयांचा नफा कमावला आहे.

सेवी थंगवेल यांनी नागपूरपासून जवळपास 15 किलोमीटर असलेल्या मोहगाव झिल्पी या गावात साधारण 10 वर्षापासून खजूर शेती करत आहेत. ही शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी, पर्यटक या गावाचा फेरफटका मारतात. सेवी थंगवेल यांनी तामिळनाडूला जाऊन खजूर शेतीचा अभ्यास केला. तिकडूनच रोप मागवले आणि दीड एकरात लागवड केली. एकतर कमी पाणी आणि उष्ण हवामान खजूर पिकाला पोषक. त्यामुळेच विदर्भातील वातावरणाचा फायदा सेवी थंगवेल यांनी खजूर शेतीसाठी करुन घेतला. ठिबकने शेतीला पाणी पुरवलं आणि शेणखत दिलं. त्यामुळे सातव्या वर्षापासूनच त्यांना उत्पादन मिळण्यास सुरु झालं.

एका झाडापासून जवळपास 300 किलोपर्यंत उत्पादन
सेवी थंगवेल यांच्या माहितीनुसार, खजुराच्या एका झाडापासून जवळपास 300 किलोपर्यंतचं उत्पनादन मिळतं. बाजारात सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थिती ओल्या खजुरांचा दर 700 ते 1000 रुपये प्रतिकिलो असा आहे. त्यावरुन सेवी थंगवेल यांच्या खजूर शेतीचा अंदाज बांधता येऊ शकतो.

लागवड :-
साधारण 25 बाय 25 अंतरावर 3 बाय 3 खड्डा खणून, त्यामध्ये शेणखत आणि माती टाकून लागवड केली जाते. त्यामुळे दोन झाडांच्या मध्ये तुम्ही अंतरपीक घेऊ शकता, असं सेवी थंगवेल सांगतात

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

26 mins ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago