माझी शेती : आधुनिक ‘केळी’ फळ पीक व्यवस्थापण कसे असावे

महाराष्ट्र 14 न्यूज : माझी शेती – केळी फळपीक व्यवस्थापण

🔴जमीन
भारी, कसदार, गाळाची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी चांगला निचरा होणारी व सामू ६ ते ७.५ दरम्यान असणारी जमीन निवडावी.

🔴हवामान
केळीला उष्ण व दमट हवामान मानवते. केळीच्या चांगल्या वाढीसाठी २५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. या पिकासाठी सापेक्ष आर्द्र���ा ५०- ६५ % असावी लागते.

🔴लागवडीची वेळ व हंगाम
योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास केळीची लागवड वर्षभरात कधीही करता येते. तरीही कमी तापमान व अति तापमान कालावधी वगळून केळीची लागवड करावी.
मृग बाग- लागवड ५ जून- जुलै
कांदे बाग- लागवड ऑक्टो- नोव्हेंबर

🔴पूर्व मशागत
जमिनीची खोल नांगरट करून २- ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. शेवटच्या कुळवणीपुर्वी १० ते १२ ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमीन तयार झाल्यानंतर १ x १ x १ फुट आकाराचे खड्डे तयार करून प्रत्येक खड्डा खालील मिश्रणाने ३/४ भरून घ्यावा:
शेणखत १० किलो किंवा गांडूळ खत ५ किलो, निंबोळी पेंड ५०० ग्रॅम , बाविस्टीन ५ ग्रॅम , फोरेट ५ ग्रॅम , कार्बोफ्युरॉन १० ग्रॅम , जैविक खते- १०० ग्रॅम

🔴लागवड
झाडांमधील आंतर
झाडांची हेक्टरी संख्या
५ बाय ५ फुट
४४४४
६ बाय ५ फुट
३७००
४ बाय ६ फुट
३०६८
४.७ बाय ५ फुट
३१७४
०.९ x १.२ x २.१ मी (जोड ओळ पद्धत)
४४४४

🔴सुधारीत वाण
बसराई- पनामा रोगास प्रतिकारक, बंची टॉप रोगास बळी पडते.
श्रीमंती- घड पक्व होण्यास अधिक कालावधी लागतो.
ग्रँड नैन- केळीच्या फण्यांमध्ये १५ से.मी अंतर असल्यामुळे फळांची वाढ भरपूर होते. केळीची लांबी २२ – २५ से.मी. असते. फळ प्रक्रियेस उत्तम.

🔴खत व्यवस्थापन

🔴पाणी व्यवस्थापन
केळी पिकास एकूण १८०० ते २२०० मी.मी. पाणी लागते. केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त आहे. केळीला पावसाळ्यात ८- १० लि पाणी/ झाड/ दिवस, हिवाळ्यात १०- १५ लि/ झाड/ दिवस आणि उन्हाळ्यात १६- २५ लि/ झाड/ दिवस पाण्याची मात्रा आवश्यक असून हवामान, जमिनीचा प्रकार व पीकवाढीची अवस्था यांनुसार योग्य तो बदल करावा.

🔴आंतर मशागत
केळीची बाग सतत तणमुक्त ठेवावी. २० – २५ दिवसांच्या अंतराने आडव्या उभ्या पाळ्या माराव्यात. ४ महिन्यांनी खोदणी करून बुंध्याभोवती माती लावावी.
मुख्य खोडासोबत स्पर्धा टाळण्यासाठी केळीची पिल्ले कोयता किंवा विळ्याने कापत राहावे. केळफुल बाहेर पडल्यानंतर विरुद्ध बाजूने एक सशक्त पिलू ठेवावे.
दोन फुलफण्या बाहेर पडल्यानंतर केळ फुल कापावे.
जसजसे घडाचे वजन वाढते तसे केळीच्या झाडांना बांबू/ पॉलीप्रोपिलीन पट्ट्यांनी बांधावे. केळीचे घड बाहेर पडल्यानंतर ५ मायक्रॉन गेजच्या स्कर्टिंग बॅगने झाकावेत.

🔴पीक संरक्षण
सिगटोका करपा- रोगग्रस्त पाने काढून जाळावीत. नियंत्रणासाठी झाडावर १० ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा २५ ग्रॅम डायथेन एम-४५ किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक स्टीकर १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पर्णगुच्छ- रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकशाकाची फवारणी करावी.सोंडेकीड- नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात १५० ग्रॅम अॅसिफेट मिसळून या द्रावणात बुडवून कंद लागवड करावी. लागवडीनंतर प्रति झाड २० ग्रॅम फोरेट द्यावे.
फुलकीडी- नियंत्रणासाठी अॅसेटामिप्रीड २० एस.पी. १.२५ ग्रॅम किंवा व्हर्टीसिलीयम लीकॅनी ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घडावर स्कर्टिंग बॅग लावावी.

🔴कालावधी
लागवडीपासून २७० ते २८० दिवसांत केळीला फळधारणा चालू होते व त्यांनतर ९० ते ११० दिवसांत घड काढणीस तयार होतात. फळांचा हिरवा रंग पिवळसर होऊन फळाला गोलाई येणे हे पक्वतेचे लक्षण आहे.

🔴उत्पादन
३५ ते ४० टन/ एकर

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

18 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago