‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानाचा प्रभाग क्र. १७ वाल्हेकरवाडी येथे प्रारंभ … नागरिकांनी सहकार्य करण्याचे ‘बिभीषण चौधरी’ यांचे आवाहन!

 

महाराष्ट्र 14 न्यूज : आमदार लक्ष्मण जगताप आणि भा.ज.पा.शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली “माझे कुटंब माझी जबाबदारी” ह्या मोहिमेचे आज प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी मधील ५० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन, या अभियानाचा प्रारंभ नामदेव ढाके सत्तारूढ पक्षनेते यांचे हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘बिभीषण चौधरी’ स्विकृत नगरसदस्य यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांना माहिती देण्यात आली.

यावेळी प्रभाग अधिकारी सौ.देशमूख ,प्रशासन अधिकारी जोशी, डाॅ.सौ.नलावडे, आदेश नवले, समाधान भंडारी, प्रकाश आखाडे, सोहम बारी, योगेश वाणी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही फार गरजेचा आहे.

त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा विचार करून, या मोहिमेत एकत्रितपणे सहभागी होऊन, सर्व नागरिकांनी स्वयंफुर्तीने सामाजिक बांधिलकी म्हणुन पुढे येऊन कोणताही संकोच न ठेवता, भीती न बाळगता तपासणीसाठी सहकार्य करावे. या आरोग्य मोहिमेत सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना जनतेचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविका, भा.ज.पा.पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्व सुविधा उभारत आहोत. लॉकडाऊन काळातही त्यानी ही लाट थोपविली होती. मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनासह अहोरात्र मेहनत करीत आहेत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागेल. यासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल. पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, ॲटीजेन किट इ. साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या प्रभागातील नगरसेवक , नगरसेविका व महानगरपालिका कटिबद्ध आहे. तरी प्रभागातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती लोकप्रतिनिधींनी केली.

स्वयंसेवक (आरोग्य दूत) आपल्या कडे माहितीसाठी (तपासणी करिता) आल्यानंतर त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच भा.ज.पा.च्या सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र . प्रमुख,बुथ प्रमुख यांना विनंती आहे की आपण स्वयंसेवकांना आपल्या भागात मदत करावी, असे आवाहन वाल्हेकरवाडी मधील नागरिकांना बिभीषण चौधरी (स्विकृत नगरसदस्य, ब,प्रभाग, पिं.चिं.म.न.पा.) यांनी केले आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago