Categories: Education

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाळेचा पहिला दिवस “शाळा प्रवेशोत्सव” म्हणून उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ जून २०२२) :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पालक, शिक्षक आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करून उत्साही आणि आनंदी वातावरणात त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात झाली.  क्रांतिसूर्य जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेचा पहिला दिवस “शाळा प्रवेशोत्सव” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.  शाळांच्या इमारती लहान बालकांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजल्या.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या निर्देशानुसार महापालिकांच्या शाळेत शाळेचा पहिला दिवस हा शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत आलेल्या पालकांचे  महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.

 महापलिकेच्या ८२ शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढला आहे.  मागील आठवड्यात महापालिकेच्या बोपखेल येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या नवीन मराठी शाळा क्र. ५४ मध्ये मुख्याध्यापिका तसेच शिक्षक मावशी यांनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. प्रवेशद्वारावर भव्य दिव्य रांगोळी काढून त्यावर आरास केली होती. शाळेतील प्रत्येक वर्गातील फळ्यावर विदयार्थ्यांचे स्वागत असे रेखाटण्यात आले होते. आकर्षक फुलांच्या माळांनी वर्ग सजविण्यात आले होते.
यावेळी माजी शिक्षण समिती सभापती माधवी राजापूरे, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, नगरसेवक शशिकांत कदम, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, बालभारती शिक्षण संचालक कृष्ण कुमार पाटील, ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी राजेश ठाकर, पर्यवेक्षक शिक्षण विभाग रामदास लेंभे, मुख्याध्यापिका साधना वाघमारे, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी पुष्प वर्षाव करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. खाजगी शाळेत मोठ्या प्रमाणात फी आणि इतर खर्च करावा लागतो. त्या तुलनेत महानगरपालिकांच्या शाळामध्ये मोफत व दर्जेदार शिक्षण दिले जाते. महापालिकेच्या शाळांमध्ये ई – क्लास उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्गात स्मार्ट टी. व्ही. संगणक आणि  गणित कक्ष यांची सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर शक्य झाला आहे. तसेच प्रत्येक शाळेत विज्ञान, गणित आणि संगणक शिकविण्यासाठी स्वतंत्र तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक केली आहे.

खाजगी शाळाप्रमाणे महानगरपालिकांच्या शाळेतदेखील उत्तम  सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. सर्व मुलांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य व दुपारचे जेवण (मध्यान्ह भोजन) ही मोफत दिले जाते. विविध शिष्यवृत्यांचा लाभही दिला जातो. एम.एस.सी.आय.टी संगणक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. ‘बाला’ उपक्रमांतर्गत शालेय भिंती वर्ग व शालेय परिसर हा विविध चित्रे यामधून आकर्षक झालेला आहे. मोफत व दर्जेदार शिक्षण यामुळे यावर्षी ५५०  विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या शाळामध्ये दाखल झालेले आहेत. आकांक्षा फाउंडेशन सोबत  करार करून ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा शहराच्या विविध भागात सुरु आहेत.

सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी, शिष्यवृत्ती, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, इंग्रजी उपक्रम स्पर्धा यासारख्या  स्पर्धा घेतल्या जातात. मातृभाषा आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.  तसेच मोफत आरोग्य तपासणीदेखील केली जाते.   १० वी आणि १२ वी मध्ये  यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना  बक्षीस स्वरुपात रोख रक्कम दिली जाते.

पिपरी चिंचवड महानगरपालिकांच्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली जाते. या वर्षी इंग्रजी, कराटे, मल्लखांब, फुटबॉल, हॉकी, नेमबाजी आणि धाडसी खेळ यांना चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

18 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago